तुम्हाला दैनंदिन कामांवर लक्ष केंद्रित करणे कठीण जात आहे का? तुम्ही गोष्टी सहज विसरत आहात का? एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याचा प्रयत्न करताना तुमचा अनेकदा गोंधळ होतो का? यापैकी कोणत्याही प्रश्नाचे तुमचे उत्तर होय असल्यास, ते ब्रेन फॉगचे लक्षण असू शकते. सध्या ब्रेन फॉग हा एक आरोग्याशी संबंधित शब्द सतत कानावर पडत आहे. ब्रेन फॉग ही एक सामान्य स्थिती आहे, जी तुमच्या योग्य विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम करते. मेंदूतील धुक्यासाठी कोणताही विशिष्ट उपचार नसला तरी आपल्या आहार आणि जीवनशैलीत काही बदल करून त्याचे व्यवस्थापन केले जाऊ शकते. तुमचा मेंदू किती चांगल्या प्रकारे कार्य करतो यावर तुम्ही दररोज खाल्लेल्या अन्नाचा मोठा फरक पडतो. अलीकडेच पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर चार पदार्थ सांगितले आहेत, जे ब्रेन फॉग कमी करण्यास आणि मानसिक स्पष्टता परत मिळविण्यात मदत करू शकतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा