Right Time To Eat Breakfast : अनेकदा आपण ऐकलं असेल की, सकाळचा नाश्ता हा राजासारखा असावा, दुपारचे जेवण राजकुमारासारखे आणि रात्रीचे जेवण भिकाऱ्यासारखे असावे. कारण नाश्ता हा रात्री दीर्घ झोपेनंतर घेण्यात येणारा पहिला आहार असतो. त्यामुळे सकाळचा नाश्ता फार महत्त्वाचा असतो. सकाळी पोटभर नाश्ता केला तर संपूर्ण दिवस काम करण्यास ऊर्जा मिळते. पण, नाश्त्यामध्ये तुम्ही काय खाता हेच महत्वाचे नसते, तर तुम्ही नाश्ता कोणत्या वेळेत करता हा देखील महत्त्वाचा विषय आहे, कारण तुमच्या नाश्त्याच्या वेळेपासून शरीराचे खाण्याचे चक्र सुरू होत असते. त्यामुळे तुमच्या नाश्ता करण्याच्या चुकीच्या वेळांमुळे रक्तवाहिन्या आणि हृदयावर परिणाम होत असतात.

सकाळचा नाश्ता उशीरा केल्यास काय परिणाम होतो?

कॉफी प्यायल्याने मृत्यूचा धोका कमी होतो? अभ्यासातून नेमकं काय समोर आलं? (फोटो सौजन्य @freepik)
Coffee Benefits : कॉफी प्यायल्याने मृत्यूचा धोका कमी होतो? अभ्यासातून नेमकं काय समोर आलं?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
ating eggs with cholesterol
दररोज अंडी खाल्ल्यास शरीरावर नेमका काय परिणाम होतो? बॅड कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात होते वाढ? वाचा डॉक्टर काय सांगतात
Does Onion Juice really work for Stomach Aches
पोटदुखीपासून आराम मिळण्यासाठी खरंच कांद्याचा रस फायद्याचा आहे का? कुशा कपिलाने सांगितला वैयक्तिक अनुभव; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात?
Meal Plan For Winter
Meal Plan For Winter : सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत… थंडीत तुम्ही कसा आहार घेतला पाहिजे? वाचा, ‘ही’ आहारतज्ज्ञांनी दिलेली यादी
Makar sankranti Til ladoo recipe how to make tilgul at home makar sankranti 2025 recipe in marathi
मकर संक्रांत स्पेशल: संपेपर्यंत खुसखुशीत राहणारे १ किलो मऊसूत तिळाचे लाडू; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Here’s what happens to the body if you have ghee water on an empty stomach daily
Ghee: झोपेतून उठताच एक चमचा तुपाचे सेवन करण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क; खाण्याची पद्धतही नीट वाचा
What happens to the body when you sleep at 8 PM and wake up at 4 AM? health tips
जर तुम्ही रात्री ८ वाजता झोपला आणि पहाटे ४ वाजता उठला, तर शरीरावर काय परिणाम होईल? वाचा डॉक्टर काय सांगतात

नेचर कम्युनिकेशन्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला कोणत्या वेळी खाता, ज्याचा तुमच्या हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यात फ्रान्समधील बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ आणि एका युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या टीमला असे आढळून आले की, तुम्ही सकाळी जितक्या लवकर नाश्ता करता त्याचा तुमच्या हृदय आणि रक्तवाहिन्यांवर चांगला परिणाम होत असतो. (Best time for breakfast)

रात्रीच्या जेवणाच्याबाबतीतही हेच आहे. तुम्ही जेवढ्या उशिरा जेवण कराल, त्याचा वाईट परिणाम तुमच्या हृदय आणि रक्तवाहिन्यांवर होतो. यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांचा धोका वाढतो. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी संशोधकांनी १,०३,००० लोकांच्या सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतच्या वेळा आणि त्याचा परिणाम याविषयी २००९ ते २०२२ या कालावधीपर्यंत अभ्यास केला.

खाण्याच्या वेळेचा आणि तुमच्या ह्रदय आणि रक्तवाहिन्यांचासंबंध काय?

या अभ्यासातून सहभागी लोकांच्या खाण्याच्या सवयी, जेवणाची वेळ, हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आजार यांच्यातील संबंध समजून घेतला. हा अभ्यास असे सूचित करतो की, तुमची जेवणाची वेळ ही सर्केडियन रिदमशी संबंधित हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार विशेषत: कोरोनरी हार्ट डिसीज, हायपरटेन्शन, हार्ट फेल्यूअर, हार्ट व्हॉल्व्ह डिसीज, स्ट्रोक आणि हार्ट रिदम डिसऑर्डरचा धोका कमी करण्यास महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

अभ्यासाचे निष्कर्ष असे दर्शवतात की, एखादी व्यक्ती दिवसा उशिरा जेवली तर हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित रोगाचा धोका सहा टक्क्यांनी वाढतो. सकाळच्या नाश्त्याबाबतही हेच आहे. उदा. एखादी व्यक्ती सकाळी ९ वाजता नाश्ता करत असेल, तर तिचा हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजाराचा धोका सकाळी ८ वाजता नाश्ता करणाऱ्यांच्या तुलनेत सहा टक्क्यांनी वाढतो.

Read More Lifestyle News : पावसाळ्यात लाकडी फर्निचरवरील बुरशी, काळे डाग साफ करताना ‘या’ चुका टाळा, अन्यथा फर्निचर खराब झालेच म्हणून समजा

त्याचप्रमाणे रात्री ९ वाजल्यानंतर जेवणाऱ्या लोकांना रात्री ८ पूर्वी जेवणाऱ्या लोकांच्या तुलनेत हृदय, रक्तवाहिन्या आणि सेरेब्रोव्हस्कूलर रोगाचा धोका २८ टक्क्यांनी वाढतो.

संशोधकांनी असेही म्हटले की, हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आजार रोखण्यासाठी तुमच्या जेवणाच्या वेळेची भूमिका महत्त्वाची आहे. यातून असेही सूचित करण्यात आले की, रात्रीच्या वेळी थोडे कमी जेवल्यास किंवा उपाशी राहिल्यास हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांचा धोका टाळता येऊ शकतो.(best time to eat breakfast for heart health)

दरम्यान, जगभरात हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांनी ग्रासलेल्या लोकांची संख्या सातत्याने वाढतेय. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगभरातील सर्वाधिक मृत्यूंमागे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आजार कारणीभूत आहेत. यामुळे दरवर्षी १७.९ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. यामुळे आवश्यक ती पावले उचलणे गरजेचे आहे.

तसेच हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांची जोखीम ठेवण्यासाठी योग्य वेळी खाणे, चांगली झोप, योग्य अन्नपदार्थ खाणे फार गरजेचे आहे.

Story img Loader