आंबट-गोड चवीच्या संत्र्यामध्ये जीवनसत्त्व, पोषक घटक आणि नैसर्गिक तेल भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे या फळाचा आपण आपल्या आहारात हमखास समावेश करत असतो. याचे शरीराला होणारे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत. मात्र या संत्र्याच्या सालांचासुद्धा आपल्याला तितकाच उपयोग असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपली त्वचा आणि केस सुंदर दिसण्यासाठी याच्या सालांचा वापर केला जाऊ शकतो. बाजारात मिळणाऱ्या फेसमास्क, क्रीम किंवा इतर अशा महागड्या उत्पादनांवर पैसे खर्च करण्यापेक्षा या पाच घरगुती ट्रिक्स वापरून पाहा.

१. फेस मास्क

सर्वप्रथम संत्र्याची सालं उन्हामध्ये वाळवून, त्याची बारीक पावडर बनवून घ्या.
तयार पावडरमध्ये दही किंवा मध मिसळून एक मिश्रण तयार करा.
आता तयार मिश्रण आपल्या चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटांसाठी लावून ठेवा.
शेवटी गार पाण्याने चेहरा धुवून टाका.
यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील मुरुमं, डाग कमी होण्यासाठी तसेच चेहरा उजळण्यासाठी फायदा होऊ शकतो.

हेही वाचा : Lip care: सगळे विचारतील तुमच्या ‘नाजूक गुलाबी’ ओठांचे रहस्य!! या सोप्या नऊ टिप्स वापरून पाहा….

२. बॉडी स्क्रब

संत्र्याच्या सालांची पावडर, साखर आणि ऑलिव्ह तेल एकत्र मिस्करमध्ये वाटून एक मिश्रण बनवून घ्या.
आंघोळीदरम्यान या तयार केलेल्या मिश्रणाचा स्क्रब म्हणून वापर करा.
यामुळे तुमच्या शरीरावरील मृत त्वचा म्हणजेच डेड स्किन काढून टाकण्यास मदत होते. ज्यामुळे त्वचा अगदी मऊ होते.

३. टोनर

वाळवलेली संत्र्याची सालं विच हेझल [witch hazel] किंवा पाण्यामध्ये काही दिवस भिजवून ठेवावी.
काही दिवसानंतर हे पाणी गाळून, चेहऱ्यावर त्याचा टोनर म्हणून वापर करू शकता.
संत्र्याच्या सालीत असणाऱ्या पोषक घटकांमुळे चेहऱ्यावर तजेला येण्यास मदत होते.

४. संत्र्याच्या सालीचे तेल

संत्र्याच्या सालांना व्यवस्थित कोरडे करून एका हवाबंद डब्यामध्ये भरून घ्या.
आता या सालांना नारळाच्या, बदामाच्या अशा कोणत्याही तेलामध्ये काही आठवडे भिजवून ठेऊन द्या.
नंतर हे तेल गाळून एका बाटलीत भरून तुमच्या चेहऱ्यावर मसाज करण्यासाठी वापरू शकता.
संत्र्याच्या सालांमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल घटक या तेलामध्ये मुरल्याने त्याचा फायदा तुमच्या त्वचेला होतो.

हेही वाचा : नुसती कॉफी पिऊ नका, तर डोळ्याखालीसुद्धा लावा; काळी वर्तुळं घालवण्याच्या टिप्स पहा…

५. केस धुण्यासाठी

एका पातेल्यात पाणी घेऊन त्यामध्ये संत्र्याची सालं उकळून घ्या.
हे पाणी गाळून गार होऊ द्या.
केस शाम्पूने धुतल्यानंतर, सर्वात शेवटी केसांवरून हे पाणी घालून त्यांना धुवून घ्या.
संत्र्याच्या सालांमध्ये असणारे नैसर्गिक तेल तुमच्या केसांना मऊ आणि चमकदार ठेवण्यास मदत करते. अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या एका लेखावरून समजते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bright skin to shiny hair use orange peels for skin care routine try this simple diy hacks dha