Railway Rules: भारतात दररोज रेल्वेने लाखो-करोडो लोक प्रवास करतात. या महागाईच्या काळात प्रवास करण्यासाठी रेल्वे हे एकमेव सुरक्षित आणि किफायतशीर साधन आहे. रेल्वेचे प्रवाशांसाठी अनेक नियम आहेत. पण त्याविषयी प्रवाशांना फार कमी माहिती असते. रेल्वेतून रोजचा प्रवास करताना आपणाला रेल्वेचे प्रत्येक नियम माहिती असतात असे नाही. त्यातील एक म्हणजे, रेल्वे स्थानकावर दात घासणे.
रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करणारे बहुतेक प्रवासी सकाळी रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर प्लॅटफॉर्मवरील नळांवर दात घासण्यास सुरुवात करतात आणि रात्रीच्या जेवणासाठी वापरलेली भांडी देखील धुतात. यानंतर चहा-नाश्ताही तिथेच केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का, रेल्वे स्थानक परिसरात नळ किंवा इतर ठिकाणी (शौचालय सोडून) भांडी धुणे, दात घासणे हा गुन्हा आहे. या कामासाठी रेल्वे तुमच्यावर दंडही आकारू शकते. जाणून घेऊया रेल्वेचे नियम, जे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत.
रेल्वे अधिनियम १९८९ नुसार, ब्रश करणे, थुंकणे, शौचालय, भांडी धुणे, कपडे किंवा रेल्वेच्या आवारातील नियुक्त ठिकाणांव्यतिरिक्त इतर कोणतीही गोष्ट गुन्ह्याच्या श्रेणीत येते. ही कामे केवळ शौचालये इत्यादी नियुक्त ठिकाणीच करता येतात. जर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तुम्हाला हे प्रतिबंधित कृत्य करताना पकडले तर प्रवाशाकडून ५०० रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. रेल्वेमध्ये अशा कृत्यांसाठी दंड आकारण्याची तरतूद आहे.
(हे ही वाचा: महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी समोरासमोर दोन वेगवेगळ्या नावाची रेल्वे स्थानकं; शहराचे नाव वाचून व्हाल चकित)
‘हे’ नियम देखील माहित करुन घ्या
रेल्वे किंवा रेल्वेच्या आवारात कोणत्याही ठिकाणी तुम्ही काही लिहिल्यास किंवा काही पोस्टर लावल्यास रेल्वे कायद्यानुसार हे देखील गुन्ह्याच्या श्रेणीत येते. यावर दंड आकारला जाऊ शकतो.
चिप्स किंवा इतर गोष्टी खाल्ल्यानंतर बहुतांश प्रवासी स्टेशनच्या आवारातील रिकाम्या जागेत रॅपर टाकतात. हा देखील गुन्हा आहे. नियुक्त केलेल्या ठिकाणाव्यतिरिक्त कोणत्याही भरलेल्या किंवा रिकाम्या रेल्वेच्या आवारात किंवा डब्यात कचरा टाकता येणार नाही.
भारतीय रेल्वेने दात घासण्यासाठी, भांडी, कपडे किंवा इतर गोष्टी धुण्यासाठी जागा निश्चित केली आहे. प्लॅटफॉर्मवरील नळांवर, नियुक्त केलेल्या ठिकाणांव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी प्रवासी हे काम करताना आढळल्यास, त्यांच्यावर दंडाची तरतूद आहे.