सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलने खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी अनोखा प्लॅन जाहीर केला आहे. रिलायन्स जिओने बाजारात प्रवेश केल्यापासून टेलिकॉम कंपन्यांमधील वॉर वाढले आहे. कधी ग्राहकांना मोफत कॉलिंगची सुविधा देत तर कधी कमी रुपयांत जास्तीत जास्त इंटरनेट डेटा देत कंपन्या ग्राहकांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक वर्षांपासून आपल्या ग्राहकांना सेवा देणाऱ्या बीएसएनएलला १८ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने कंपनीने खास ऑफर जाहीर केली आहे. याअंतर्गत कंपनी चार नवे प्लॅन्स जाहीर दाखल करत आहे. STV 18, STV 601, STV 1201, STV 1801 अशी या प्लॅन्सची नावे आहेत.

१ ऑक्टोबरपासून लागू होणारे हे प्लॅन्स १८ ऑक्टोबरपर्यंत असतील असे सांगण्यात आले आहे. १८ रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी २ दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, व्हिडियो कॉलिंग, इंटरनेट डेटा मिळणार आहे. त्याशिवाय ६०१, १२०१, १८०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये १८ टक्के जास्त डेटा दिला जाणार आहे. त्यामुळे कंपनी आपला वर्धापनदिन साजरा करणार आहे. याशिवायही बीएसएनएलने जिओला टक्कर देण्यासाठी ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या आहेत. नुकतीच कंपनीने आपली मान्सून ऑफरची व्हॅलिडीटीही वाढवली आहे. सुरुवातीला ही ऑफर १५ सप्टेंबरपर्यंत होती मात्र काही दिवसांवर आलेल्या सणांच्या निमित्ताने कंपनीने ही ऑफर वाढवली आहे.