सरकारी भागीदारी असलेल्या BSNL कडून सातत्याने नवनवीन प्लॅन्सची घोषणा करण्यात येत असते. नुकताच कंपनीने आपला एक प्रीपेड प्लॅन जाहीर केला असून त्यामुळे ग्राहकांना अतिशय कमी किमतीत भरपूर इंटरनेट डेटा मिळू शकणार आहे. जिओने बाजारात प्रवेश केल्यापासून इंटरनेट कंपन्यांमधील स्पर्धा जोरदार वाढली आहे. त्यामुळे कंपन्या ठराविक काळाने एकाहून एक आकर्षक प्लॅन जाहीर करताना दिसतात. BSNL चा हा प्लॅन नवीन नसून आधीच्याच प्लॅनमध्ये कंपनीने बदल केले आहेत. ७८ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये १० दिवसांसाठी तब्बल २० जीबी डेटा मिळणार आहे. यामध्ये कंपनीने जीबी लिमिट आणि व्हॅलिडीटी दोन्ही वाढवल्याने ग्राहकांसाठी हा प्लॅन अतिशय फायदेशीर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याआधी ७८ रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनीकडून ३ दिवसांसाठी ६ जीबी डेटा देण्यात येत होता. आताचा नवीन प्लॅन कंपनीच्या सर्व २२ सर्कलमध्ये उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. यामध्ये ग्राहकांना २ जी आणि ३ जी स्पीड मिळणार आहे. मात्र ४ जी स्पीड मिळू शकणार नाही. या प्लॅनमध्ये इंटरनेटशिवाय कंपनी ग्राहकांना पूर्ण देशभरात मोफत कॉलिंगची सुविधा देत आहे. मात्र हा १० जीबी डेटा ग्राहकांना रोज विभागून वापरावा लागणार आहे. यामध्ये रोज २.१ जीबी डेटा वापरता येणार आहे. ही ऑफर कंपनीच्या १६९९, २०९९, १८६, ४२९, ४८५, ६६६ आणि ९९९ या प्रीपेड प्लॅनवर हा ७८ रुपयांचा प्लॅन लागू होणार आहे.