बीएसएनएल ही खूप जुनी भारतीय कंपनी आहे. लाखांच्या घरात कंपनीचे ग्राहक आहेत. बीएसएनएलने नुकतीच एक नवीन प्लॅनची घोषणा केली आहे. ज्यामध्ये कोणतीही डेटा मर्यादा नाही. एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन-आयडिया यांनीही असेच प्लॅन आणले आहेत. इतर दूरसंचार कंपन्यांच्या स्पर्धेत बीएसएनएलने ही भाग घेतला आहे. ४४७ रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनसह एसटीव्ही २४७ आणि एसटीव्ही १,९९९ या प्रीपेड प्लॅनमध्ये नवीन बदलांची घोषणा केली आहे.
काय आहे नवीन प्लॅन?
एसटीव्ही ४४७ या प्लॅनच्या शुभारंभाची माहिती बीएसएनएल चेन्नईच्या ट्विटरवरून ग्राहकांना दिली गेली. या प्लॅनची वैधता ६० दिवसांची आहे. यामध्ये एकूण १०० जी.बी. डेटा आहे. संपूर्ण डेडा संपल्यावर बीएसएनएल ग्राहकांना ८० केबीपीएस वेगाने अमर्याद डेटा पुरविणार आहे. दररोज अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि १०० मोफत एसएमएस देखील यात आहेत. तसेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना योजनेसह EROS Now आणि बीएसएनएल ट्यूनचं सभासदत्व देखील मिळणार आहे.
— BSNL_Chennai (@BSNL_CHTD) July 5, 2021
२ जुन्या प्लॅनमध्येही मोठे बदल
बीएसएनएलच्या २४७ रुपयांच्या टॅरिफ व्हाउचरमध्ये आता एकूण ५० जी.बी. डेटा मिळणार आहे. पूर्वी या प्लॅनमध्ये दररोज ३ जी.बी. डेटा दिला जात होता. आत्ताच्या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल, दररोज १०० फ्री एसएमएस आणि बीएसएनएल ट्यून आणि EROS Now च सभासदत्व मिळणार आहे. या प्लॅनची वैधता ३० दिवसांची आहे.
१,९९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ५०० जी.बी. हाय स्पीड एकूण डेटा मिळणार आहे. पहिल्या ९० दिवसांत रिचार्ज करणार्यांसाठी १०० जी.बी. अतिरिक्त डेटासुद्धा मिळणार आहे. या प्लॅनमध्येही अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० फ्री एसएमएस असणार आहेत. सोबतच विनामूल्य पीआरबीटी (PRBT) आणि अमर्यादित गाणे बदलण्याचा पर्यायही आहे. तसेच Lokdhun हे मनोरंजनाचं अॅप ६० दिवसांसाठी बघता येणार आहे. तर EROS Now चं १ वर्षाचं सभासदत्व मिळणार आहे. हा प्लॅन ३६५ दिवसांच्या वैधतेसह येतो.
अन्य कंपन्यांचे समान प्लॅन
४४७ रुपयांचा हा नवीन प्लॅन vi च्या समान किंमतीच्या प्लॅनशी स्पर्धा करतो. vi चित्रपट आणि टीव्हीचा विनामूल्य अॅक्सेस देते. तसेच जिओ देखील त्याच किंमतीत समान लाभ देतो. एअरटेलकडे ४५६ रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. ज्यात ३० दिवसांसाठी अतिरिक्त अमेझॉन प्राईम व्हिडिओचं मोबाईल एडिशन, एअरटेल एक्सस्ट्रीम प्रीमियम, व्यंक म्युझिकही मिळते.