रिलायन्स जिओ बाजारात आल्यापासून सर्वच टेलिकॉम कंपन्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. जिओने मोफत इंटरनेट सुविधा सुरु केल्याने कंपन्यांमध्ये स्वस्तातील प्लॅनसाठी स्पर्धा सुरु आहे. सरकारी कंपनी असलेली बीएसएनएल कंपनीही यामध्ये मागे नाही. ग्राहकांना खुश करण्यासाठी कंपनी सतत आपले पोस्टपेड आणि प्रीपेड प्लॅन जाहीर करते. नुकताच कंपनीने आपला एक अनोखा प्रीपेड प्लॅन जाहीर केला असून यामध्ये ग्राहकांना तब्बल ५६१ जीबी डेटा मिळणार आहे. हा प्लॅन ९९९ रुपयांचा असून त्याची वैधता १८१ दिवस म्हणजेच ६ महिन्यांची असेल.

आता ९९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दिवसाला २.२ जीबी डेटा मिळतो. मात्र आता ग्राहकांना दिवसाला ३.१ जीबी डेटा मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना एकूण ५६१ जीबी २जी किंवा ३ जी डेटा मिळणार आहे. इंटरनेटची मर्यादा संपल्यानंतर कंपनी ४० kbps वेगाने इंटरनेट मिळणार आहे. याशिवाय कंपनी या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग मोफत देणार आहे. याशिवायही बीएसएनएलने १६९९, २०९९ रुपयांचे धमाकेदार प्लॅन जाहीर केले आहेत. या प्लॅनची वैधता ३६५ दिवसांची असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. मात्र ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना भरपूर इंटरनेट असल्याने डाऊनलोडिंग आणि इतर गोष्टींसाठी बरेच इंटरनेट उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा प्लॅन नक्कीच फायदेशीर ठरु शकतो.

Story img Loader