दरवर्षी २५ डिसेंबर रोजी जगभरात ख्रिसमस सण साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधव एकमेकांच्या घरी जातात. एकत्र जेवण करतात. ख्रिसमस ट्रि आणि घराची सजावट करतात. ख्रिसमस म्हटलं की सर्वांच प्रमुख आकर्षण ठरतो सिक्रेट सांता जो सर्वांना भेटवस्तू देतो. आजकाल ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये सिक्रेट सांता हा खेळ खेळला जातो. यामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी एक सिक्रेट सांता चिठ्ठ्या टाकून निवडला जातो. ज्या व्यक्तीचे नाव चिठ्ठीत आले त्याला भेटवस्तू द्यावी लागते. पण कोणी कोणाला गिफ्ट दिले हे सांगायचे नसते तर ओळखायचे असते. तुम्हालाही तुमच्या ऑफिसमधील मित्रासाठी भेटवस्तू घ्यायची आहे पण तेही तुमच्या बजेटमध्ये तर चिंता करू नका. तुमच्या खिशाला झळ न पोहचता तुम्ही चांगली भेटवस्तू देऊ शकता. येथे आम्ही काही सोपे पर्याय सुचवले आहेत जे तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकता. DIY भेटवस्तू तुम्ही सर्जनशील विचार करून काहीतरी खास भेटवस्तू स्वत: तयार करू शकता जसे की, हाताने रंगवलेला मग, फोटो कोलाज किंवा हाताने तयार केलेला बुकमार्क असो, DIY भेटवस्तूमध्ये केलेला विचार आणि प्रयत्न ते खरोखरच खास ठरतात. तुम्ही स्वत: काहीतरी भेटवस्तू केल्यामुळे ती हे सुंदर भावनिक भेट ठरू शकते. हेही वाचा - २०२३मध्ये ‘या’ हटके हेअरस्टाइलला महिलांनी दिली पसंती; रुबाबदार पुरुषांची पहिली पसंत ठरली ‘ही’ हेअरस्टाइल काहीतरी चमचमीत पदार्थ करून खायला घालाएखाद्याच्या हृदयाकडे जाण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे त्याच्या पोटातून असतो. जर तुम्हासा स्वयंपाकाची आवड असेल आणि तुम्ही कोणताही पदार्थ सहज बनवू शकता तर तुम्ही कुकीज, ब्राउनीज किंवा चमचमीत पदार्थ तयार करून पॅक करून भेट देऊ शकता. त्यासाठी तुम्ही छान सजावट आणि पॅकिंगही करू शकता. हे केवळ एक मजेदार आणि चवदार भेट देणार नाही तर हे देखील दर्शवते, आपण सुरुवातीपासून काहीतरी बनवण्यासाठी वेळ आणि मेहनत घालवली आहे.तुमच्या सिक्रेट सांताला लहान रोप किंवा कुंडी भेट देऊ शकता. जर एखाद्याला झाडे लावायला आवडत असेल तर हे त्याच्यासाठी उत्तम गिफ्ट ठरू शकते. तुम्ही स्थानिक नर्सरी, गार्डन सेंटर्स किंवा अगदी सवलतीच्या स्टोअरमध्ये परवडणारे पर्याय शोधू शकता. कॉफी किंवा चहाचे सॅम्पलरतुमच्या ऑफिसमधील कॅफीन प्रेमींसाठी, कॉफी किंवा चहाचा सॅम्पलर भेट देण्याचा विचार करू शकता. आजकाल बाजारात रेडी टू मेक कॉफी पॅकेट किंवा चहाचे पर्याय उपलब्ध आहेत ते तुम्ही वापरू शकता. तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवर्स किंवा मिश्रणाच्या कॉफी थोड्या प्रमाणात खरेदी करू शकता. त्याला छान पॅक करून तुम्ही ते भेट देऊ शकता. पुस्तकजर मित्राला किंवा सहकार्याला वाचनाची आवड असेल तर पुस्तक भेट देऊ शकता. त्याच्या आवडी लक्षात घेऊन छान पुस्तक भेट देऊ शकता. छान गिफ्ट रॅप करून तुम्ही भेट देऊ शकता आणि वाचनाच्या छंदाला प्रोत्साहन देऊ शकता. सबस्क्रिप्शनजर तुमच्या बजेटनुसार पुस्तके, मासिके, स्ट्रिमिंग किंवा ऑनलाइन क्लाससाठी सबस्क्रिप्शन घेऊन भेट देऊ शकता. अनेक प्लॅटफॉर्म पहिल्या काही महिन्यांसाठी ट्रायल सबस्क्रिप्शनकिंवा सवलतीच्या दरांत सेवा देतात. हे गिफ्ट देखील उत्तम पर्याय ठरू शकते. हेही वाचा - Secret Santa गेम खेळताना चिठ्ठ्यांचा गोंधळ होतोय? आता नव्या पद्धतीने निवडा सिक्रेट सांता, जाणून घ्या सोपी ट्रिक स्थानिक कलाकुसरीच्या वस्तूहाताने तयार केलेला साबण, मेणबत्त्या किंवा चॉकलेट यासारख्या लहान, बजेटनुसार भेटवस्तू निवडून तुम्ही स्थानिक व्यवसाय आणि कारागीरांना प्रोत्साहन देऊ शकता. या अद्वितीय आणि स्थानिकरित्या तयार केलेल्या भेटवस्तू वैयक्तिक स्पर्श देतात. पाण्याची बाटलीऑफिसला जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी पाण्याची बाटली अत्यंत आवश्यक वस्तू आहे. आजकाल लोक तांब्या पितळ्याचा बाटली वापरतात कारण त्याचे आरोग्यासाठी काही फायदे असतात अशा वेळी तुम्ही स्टीलची अथवा, तांब्या -पितळची छान बाटली भेट देऊ शकता.