Budh Rashi Privartan 2022: ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर पडतो. बुध ग्रहाबद्दल बोलायचे तर हा एक तरुण आणि उत्साही ग्रह आहे. हा बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. कुंडलीतील त्याची मजबूत स्थिती व्यक्तीला बौद्धिकदृष्ट्या शक्तिशाली बनवते. मिथुन आणि कन्या राशीचा हा शासक ग्रह आहे. हे स्वतःच्या कन्या राशीत श्रेष्ठ आहे आणि मीन राशीतील बृहस्पतिच्या चिन्हात दुर्बल आहे. जाणून घ्या २०२२ मध्ये बुध ग्रह कोणत्या राशीत असेल आणि कोणत्या राशींसाठी शुभ राहील.
बुध संक्रमण तारखा:
६ मार्च दिवस रविवार – कुंभ
२४ मार्च दिवस गुरुवार – मीन
८ एप्रिल दिवस शुक्रवार – मेष
२५ एप्रिल दिवस सोमवार – वृषभ
२ जुलै दिवस शनिवार – मिथुन
( हे ही वाचा: जीन्सवरचा छोटा खिसा कॉइन ठेवण्यासाठी बनवला नव्हता, तुम्हाला बरोबर उत्तर माहित आहे का?)
१७ जुलै दिवस रविवार – कर्क
१ ऑगस्ट दिवस सोमवार – सिंह
२१ ऑगस्ट दिवस रविवार – कन्या
२६ ऑक्टोबर दिवस बुधवार – तूळ
१३ नोव्हेंबर दिवस रविवार – वृश्चिक
(हे ही वाचा: ३० वर्षांनंतर कुंभ राशीत प्रवेश करणार शनि, ‘या’ राशींना मिळेल शुभ परिणाम)
३ डिसेंबर दिवस शनिवार – धनु
२८ डिसेंबर दिवस बुधवार – मकर
३० डिसेंबर दिवस शुक्रवार – धनु
राशीनुसार बुधाच्या संक्रमणाचा परिणाम:
मेष राशीत बुधाचा प्रवेश कर्क, तूळ आणि सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो.
वृषभ राशीतील बुधाचे संक्रमण कर्क, कन्या आणि मकर राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरेल.
मिथुन, कन्या राशीसाठी बुध राशीचे संक्रमण चांगले राहील.
कर्क राशीतील बुधाचे संक्रमण मिथुन, कन्या आणि मकर राशीसाठी चांगले राहील.
(हे ही वाचा: ‘या’ ४ राशींचे लोक पैशाच्या बाबतीत मानले जातात खूप भाग्यवान, त्यांना जीवनात मिळतो प्रत्येक आनंद)
सिंह राशीत बुधाचे संक्रमण कर्क, वृश्चिक आणि धनु राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होईल.
कन्या राशीतील बुधाचे संक्रमण मिथुन, धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी शुभ राहील.
तूळ राशीतील बुधाचे संक्रमण वृषभ, कन्या आणि मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगले राहील.
(हे ही वाचा: ‘या’ तारखांना जन्मलेल्या लोकांना मिळते लवकर यश, त्यांच्यावर असतो धन देवता कुबेरचा आशीर्वाद)
वृश्चिक राशीतील बुधाचे संक्रमण कर्क, सिंह आणि मीन राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहील.
धनु राशीतील बुधाचे संक्रमण मेष, सिंह आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगले राहील.
मकर राशीतील बुधाचे संक्रमण कन्या, कर्क आणि वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरेल.
कुंभ राशीतील बुधाचे संक्रमण तूळ, वृश्चिक आणि मकर राशीसाठी शुभ राहील.
( हे ही वाचा: Numerology: ‘ही’ जन्मतारीख असलेल्या लोकांमध्ये असतो पैसे कमविण्याचा जास्त ध्यास, करिअरमध्येही मिळते लवकर यश)
मीन राशीत बुधाचे संक्रमण मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होईल.