हरियाणामधील भिवानी येथील गुजरानी गावातील एक म्हैस सध्या चांगलीच चर्चेत आहे. म्हशीचा मालक रामफल हा देखील प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. याचं कारण आहे, रामफलच्या या म्हशीची किंमत ऑडी आणि मर्सिडिझ गाडीच्या किंमतीपेक्षा जास्त आहे. ५६ लाख इतकी बोली लावण्यात आलेली ही म्हैस दिवसाला अनेक बादल्या दूध देते. गावातील लोक या म्हशीला ‘काळे सोने’ म्हणून संबोधतात. मुऱ्हा जातीची ही म्हैस सर्वसाधारण म्हशींपेक्षा जास्त दूध देते. भरपूर मात्रेमध्ये दूध देणाऱ्या या म्हशीने गावात आयोजित करण्यात आलेल्या जास्त दूध देण्याच्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविला आहे. जास्त दूध देण्याच्या गुणामुळे मुऱ्हा जातीच्या म्हशी शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या ठरतात.
ऑडी आणि मर्सिडिझपेक्षा महागडी म्हैस!
गावातील लोक या म्हशीला 'काळे सोने' म्हणून संबोधतात.
Written by दीपक मराठे
First published on: 22-01-2016 at 18:51 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buffalo price 56 lacks in haryana