कोविड-१९ मुळे आपली प्रतिकारशक्ती किती चांगली असायला हवी याची जाणीव आतापर्यंत सगळ्यांनाच झाली आहे. घरी राहून आपल्या आरोग्यावर काम करायची हीच उत्तम वेळ आहे. अनेकजण नियमितपणे व्यायाम करत आहेत. पण व्यायामाला योग्य आहाराची जोड देत नाहीत. नियमित व्यायामासोबतच उत्तम आहार घेण गरजेचं आहे हे अनेकदा एक्स्पर्ट सांगत असतात. आपण कोविड-१९ मुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळे काढे पीत आहोत. तर वेगवेगळ्या रेसिपीज सुद्धा ट्राय करत आहोत. पण या पदार्थाची चव अनेकांना आवडत नाही. आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करणाऱ्या आणि सोबतच चविष्ट लागणाऱ्या अश्या रेसिपीच्या शोधात सगळेच आहेत. अशीच एक चविष्ट रेसिपी बघुयात ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती बळकट होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य

१/२ कप –  बाजरीचे पीठ

४ कप  – पाणी

१ टीस्पून – तूप

किसलेलं आलं

१/४ कप – गूळ पावडर

१/२ टिस्पून – ओवा

कशी बनवायची ही रेसिपी?

एका कढईत तूप टाका आणि व्यवस्थित गरम होऊ द्या. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये किसलेले आले, ओवा आणि बाजरीचे पीठ घाला. या मिश्रणाला छान ब्राऊन रंग येईपपर्यंत व्यवस्थितपणे मिक्स करा. बाजरीचे पीठ पटकन जळू शकते आणि कढईला चिकटूही शकते. त्यामुळे न थांबता सातत्याने हे मिश्रण मिक्स करत राहा. आच मध्यम ठेवा. मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यावर पाणी आणि गुळाची पावडर घाला. हे मिश्रण १० मिनिटे शिजवा आणि गरम गरम सर्व्ह करा.

या रेसिपीचे फायदे काय?

बाजरी मॅग्नेशियम आणि पोटॅशियमने समृद्ध असते. रक्ताचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आणि रक्तदाबासाठी बाजरी उपयुक्त ठरते. शिवाय बाजरी हृदय निरोगी ठेवण्यासही मदत करते. गूळ आपली पचन शक्ती वाढवण्यासाठी मदत करतो. तसेच गूळ शरीर उत्तम डीटॉक्स करण्यासाठीही ओळखला जातो. ओवा आपल्या पाचन क्रियेसाठी उपयुक्त ठरतो. आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतो. ओवा रक्तातील साखर नियंत्रित करतो आणि बॅक्टेरियाशी झुंज देतो.