|| डॉ.अमोल देशमुख

गेल्या वर्षभरापासून करोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी सर्वच क्षेत्रांतून प्रयत्न केले जात आहेत आणि त्यात यशही येत आहे. सरकारी कर्मचारी, पोलीस कर्मचारी, स्वच्छता सेवा कर्मचारी आणि विशेषत: आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी सातत्याने, अथक, क्षमतेपेक्षा जास्त, असलेल्या परिस्थितीत आणि कमी मनुष्यबळात मेहनत घेत आहेत. अतिकामामुळे, काम आणि वैयक्तिक आयुष्याची सांगड घालणे अनेकांना अवघड जात आहे आणि त्यातूनच अनेक जण ‘बर्न आऊट’ होत आहेत.

Morning dizziness reason
सात-नऊ तासांची झोप पूर्ण होऊनही तुम्हाला सकाळी थकवा जाणवतो?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
interesting facts about formation of the himalayas
कुतूहल : हिमालयाची निर्मिती
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलवर रील्स पाहताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम (फोटो सौजन्य @ Freepik)
रात्री झोपण्यापूर्वी मोबाइवर रील्स पाहताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम
Marathwada Socio economic backwardness,
मराठवाड्याच्या अस्वस्थतेची पाळंमुळं
shivsena marathi news
पुण्यात भाजपच्या खेळीने शिवसेनेच्या दोन्ही गटांत अस्वस्थता
Revenue Minister Chandrashekhar Bawankule warned revenue officials
खबरदार! कामात कुचराई तर कारवाई, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणाला दिला इशारा?

बर्न आऊटला व्यवसायासंबंधी घटना म्हणून जागतिक आरोग्य संघटनेच्या आयसीडी-११च्या पुनरावृत्तीमध्ये समाविष्ट केले गेले आहे. कामावरचा सततचा ताणतणाव आणि तोचतोचपणाही शारीरिक आणि मानसिक लक्षणांना कारणीभूत ठरतोय. कायमस्वरूपी जास्त, आव्हानात्मक काम करणे, वेळेचा दबाव असणे किंवा सहकार्यांशी संघर्ष संभाव्य कारणांमध्ये समाविष्ट आहे. सततच्या तणावग्रस्त कामामुळे, लोकांच्या स्वत:च्या वैयक्तिक, शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आवश्यकतांकडे दुर्लक्ष होते.

सततच्या कामामुळे थकवा येणे साहजिक प्रतिक्रिया आहे, बर्न आऊट ताणतणावाच्या ‘साहजिक’ प्रतिक्रियेपेक्षा एक लक्षणांचा संच आहे आणि हे नेहमीच आजाराचे लक्षण नाही. बर्न आऊटची मुख्य लक्षणे, सततचा शारीरिक आणि मानसिक थकवा वाटणे, शक्तिहीन, परिस्थितीशी सामना करण्यास असमर्थ किंवा भावनिकदृष्ट्या पिळून गेल्यासारखे वाटणे. कामाशी संबंधित क्रियाकलपांपासून दूर जावे वाटते, बर्न आऊट व्यक्तीला रोजच्या कामाचा ताण अधिकच वाटू लागतो. तेव्हा त्यांच्या कामकाजाच्या परिस्थितीबद्दल आणि सहकार्याबद्दल तक्रारी होतात आणि हळूहळू ते भावनिकदृष्ट्या कामापासून दुरावतात. व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते. बर्न आऊट मुख्यत: कामावर, घरात किंवा कुटुंबातील सदस्यांची काळजी घेताना परिणाम करते. बर्न आऊट असलेले लोक त्यांच्या कामांबद्दल खूप नकारात्मक होतात. त्यांना कामावर एकाग्र करणे अवघड वाटते. तसेच त्यांची सर्जनशीलता कमी होते.

बर्न आऊटच्या लक्षणांमागे कधीकधी इतर कारणेही असू शकतात जसे की, नैराश्य विकार, चिंताविकार. सततचा थकवा, कामाविषयी समाधानी न वाटणे आणि कामातील कार्यक्षमतेचा अभाव हे लक्षण बर्न आऊट आणि नैराश्यामध्ये सामायिक असू शकतात, पण नैराश्यात, नकारात्मक विचार आणि भावना केवळ कामाबद्दल नसतात, परंतु जीवनाच्या सर्व क्षेत्रांबद्दल असतात. नैराश्याच्या इतर विशिष्ट लक्षणांमध्ये सतत उदास वाटणे, आयुष्याच्या सर्वच क्षेत्रांत रस कमी होणे, आत्मविश्वासाची कमतरता, समोर अंधकार आहे असे वाटते, आत्मघातकी विचार आणि तसा प्रयत्न, तसेच जेवण आणि झोप कमी होणे आहे. बर्न आऊट आहे म्हणण्याआधी आपल्या वैद्यकीय तज्ज्ञांसोबत आणि मानसोपचारतज्ज्ञांसोबत एकत्रित इतर संभाव्य कारणांवर विचार करणे आवश्यक आहे.

बर्न आऊटमध्ये एखाद्यास कामाच्या ठिकाणी समस्या असल्यास त्यांच्या कामकाजाच्या वातावरणामधील बदलांमुळे एक सकारात्मक बदल होऊ  शकतो. आपण सहकारी, मित्र किंवा प्रियजनांशी व्यक्त झालात तरीही त्यांचे समर्थन आणि सहयोग आपणास मदत करू शकेल. त्यामुळे आपल्याला परिस्थितीशी सामना करण्याचे बळ येते. शक्य असल्यास कामातून थोडा ब्रेक घेणेही गरजेचे असते. नियमित व्यायाम, ध्यानधारणा, योगासनेही स्वत:ला नियमित ठेवण्यास मदत करतात.

योग्य आहार आणि व्यायाम बर्न आऊटशी सामना करताना महत्त्वाचा आहे. आपले छंद, खेळ, संगीत या गोष्टीही अशा वेळी जोपासणे गरजेचे आहे. नैराश्य असल्यास मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशकांची मदत योग्यवेळी घ्यावी.

Story img Loader