5 Tips To a Soothe a Burnt Tongue : चहा पिताना पटकन तोंड भाजून जीभ पोळते आणि मग काही वेळ काहीच सुचत नाही. असा अनुभव प्रत्येकाला येतो. जीभ पोळल्यानंतर नक्कीच घाबरून जाण्याची गरज नाही हे धोकादायक नाही; मात्र त्रासदायक नक्कीच आहे. जीभ भाजल्यामुळे खाणे, पिणे आणि बोलण्यात खूप त्रास होतो. अशा स्थितीत जीभ ताबडतोब बरी झाल्यास आराम वाटतो. त्यासाठी काही सोपे घरगुती उपाय करता येतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांची काही वेळा बोलताना, जेवताना जीभ अचानकपणे चावली जाते. अशा वेळी वेदना तर होतातच; पण पाणी पितानाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. जीभ भाजली की, सामान्यत: आपण लगेच थंड पाणी पितो; पण तरीही तुमची जीभ चुरचुरत असेल, तर तुम्ही आणखी काही घरगुती उपाय करू शकता. अशाच काही घरगुती उपायांबद्दल सविस्तर जाणून घेऊ…

जिभेवर लावा साखर किंवा मध

तोंडात चटका लागल्यावर घाबरू नका; तर जिभेवर किंवा तोंडातील आतल्या कोणत्याही भागात साखर किंवा मध लावा. मधामध्ये रोगाणुविरोधी गुणधर्म अधिक प्रमाणात असतात. जीभ पोळल्यानंतर मध लावल्यानं जिभेला पटकन थंडावा मिळतो आणि जळजळ होत नाही. त्याशिवाय साखर आणि मध मिसळून लावल्यानंदेखील जिभेला त्वरित आराम मिळतो.

थंड पाणी पिणे

तुमची जीभ भाजल्यानंतर सर्वांत आधी करण्यासारखा उपाय म्हणजे थंड पाणी पिणं अथवा फ्रिजमध्ये असलेलं एखादं थंड पेय पिणं. थंड पाणी अथवा थंड पेय प्यायल्यानं तुम्हाला भाजलेल्या जिभेपासून काहीसा आराम मिळेल. थंड पेय प्यायल्यानं जिभेची जळजळ सातत्यानं जाणवणार नाही.

दही किंवा दूध पिणे

यावेळी दही खाल्ल्यानं किंवा थंड दूध प्यायल्यानंही भाजलेल्या जिभेपासून लवकर आराम मिळतो. दही व दुधात असलेले प्रो-बायोटिक्स जिभेला आराम देण्यास फायदेशीर ठरतात.

हेही वाचा >> Kitchen Jugaad Video: गॅस चालू करण्याआधी त्यावर शॅम्पू नक्की टाका; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल

मिठाच्या पाण्याने गुळण्या

मिठामध्ये सोडियम क्लोराइड असतं; जे की, जखमेवरील सूज आणि दुखणं कमी करण्यासाठी मदत करतं. मिठामधील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म जखमेपासून होणाऱ्या संक्रमणाला दूर ठेवतात. एक कप किंवा एक ग्लास पाण्यात एक चमचा मीठ घाला. तुम्ही मिठाच्या पाण्यानं गुळण्या केल्यानं जिभेवरील सूज कमी होते आणि जळजळणाऱ्या जिभेमुळे होत असणारा त्रासदेखील कमी होतो.

Story img Loader