Butter Vs Margarine : अनेक वेळा आपण बाहेर पावभाजी, सॅण्डविच वगैरे खातो. त्यासाठी बटर किंवा लोणी वापरलं जातं. पण खरंच ते बटर असतं का? बाजारात आपल्याला लाईट बटर मिळते. सर्वसामान्य बटरमध्ये कोलेस्ट्रोल असतं, त्यामुळे तुमचं वजन वाढण्याची शक्यता असते, म्हणून लाईट बटर विकलं जातं. वजनवाढ टाळण्यासाठी लाईट बटर खाण्याचा सल्ला दिला जातो. पण, हे लाईट बटर आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे का? ते खाल्ल्यामुळे काय होतं? बटर आरोग्यासाठी पौष्टिक असतं की मार्जरीन? हे सगळं जाणून घेऊयात.

बटर म्हणजे काय? लोण्यामध्ये भरपूर प्रमाणात चरबी असते आणि A, D व K ही जीवनसत्त्वं कमी प्रमाणात असतात. त्याची मलईदार रचना आणि चव यांमुळे ते चवीच्या दृष्टीनं अनेकांच्या पसंतीस उतरतं. लोणी हे व्हिटॅमिन एसारख्या चरबी-विद्रव्य जीवनसत्त्वांचा नैसर्गिक स्रोत आहे, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यातून आपल्याला हाडांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन डीदेखील मिळतं.

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Banana health benefits
दररोज एक केळे खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता? तज्ज्ञ काय सांगतात…
paneer popcorn recipe
Paneer Popcorn Recipe: पनीर लव्हर्स, ‘ही’ नवीकोरी रेसिपी लगेच करा ट्राय! एकदा खाल, तर पॉपकॉर्नची खरी चव विसराल
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?

मार्जरीन म्हणजे काय?

मार्जरीन हा एक असा पदार्थ आहे, जो बटरसारखाच दिसतो; पण वास्तवात ते बटर नसते. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की, मार्जरीन म्हणजे नक्की आहे तरी काय? मार्जरीन हा वनस्पती तेलापासून बनविण्यात आलेला पदार्थ आहे. वनस्पती तेलाला आपल्याकडे डालडा म्हणूनही ओळखलं जातं. ज्याची आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री होते. याचं मुख्य कारण म्हणजे ते स्वस्त असतं. त्यामुळे ग्राहकदेखील ते लगेच खरेदी करतात. विशेष म्हणजे यातून विक्रेत्याला चांगला नफा मिळत असल्यानं तोदेखील याच्याकडे पैसा कमवण्याचं साधन या दृष्टिकोनातून पाहतो. पण, याचे आपल्या आरोग्याला काय फायदे आणि तोटे आहेत? ते जाणून घेऊयात.

मार्जरीन वनस्पती तेलापासून बनविण्यात येत असल्यामुळे त्यात कोलेस्ट्रॉल नसतं. पण, बटरसारखं दिसावं म्हणून यात अनेक रसायनं वापरली जातात, ज्यांचा आपल्या हृदयावर थेट परिणाम होतो.

मार्जरीन बनविताना उच्च तापमानाचा वापर केला जात असल्यानं वनस्पती तेलामधील जीवनसत्त्वं निघून जातात.

हेही वाचा >> केक खाण्याचे शौकीन असाल तर सावधान! ‘या’ १२ केकच्या सेवनानं होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टरांनी सांगितला धोका

बटर आरोग्यासाठी पौष्टिक असतं की मार्जरीन?

मार्जरीन हे बटर नसल्यामुळे त्यापासून आपल्या आरोग्याला काहीच लाभ मिळत नाहीत. त्याचे काही फायदे असले तरीही तोटेही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर बटर आरोग्यासाठी पौष्टिक असतं. बटरचं मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास आपल्या आरोग्याला हानी पोहोचत नाही; पण जास्त प्रमाणात बटर खाल्ल्यानं शरीराची अनेक प्रकारे हानी होऊ शकते.

Story img Loader