दुचाकी सेक्टरच्या बाईक सेगमेंटमध्ये कमी बजेटमध्ये हाय मायलेज बाईक्सची विस्तृत श्रेणी आहे. ज्यामध्ये सर्वात जास्त उपस्थिती बजाज, टीव्हीएस आणि हिरो सारख्या कंपन्यांची आहे.ज्यात आज आम्ही टीव्हीएस स्टार सिटी प्लस बद्दल बोलत आहोत, जी त्याच्या कंपनीची सर्वात जास्त विकली जाणारी मायलेज बाईक आहे,तसेच कमी बजेटमध्ये शक्तिशाली मायलेज देते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जर तुम्हाला ही बाईक खरेदी करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला ६८,४७५ ते ७०,९७५ रुपये खर्च करावे लागतील, पण तुमच्याकडे एवढे मोठे बजेट नसेल, तर येथे तुम्ही कमीत कमी डाउन पेमेंटवर ही बाईक खरेदी करायची की नाही हे जाणून घेऊ शकता. फक्त आठ हजार रुपये देऊन तुम्ही बाईक कशी विकत घेऊ शकता या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या. पण हा प्लॅन जाणून घेण्याआधी तुम्हाला या बाईकचे मायलेज, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनशी संबंधित प्रत्येक तपशील माहित असणे आवश्यक आहे.

( हे ही वाचा: Tata Punch पासून Mahindra Thar पर्यंत…’या’ आहेत भारतातील टॉप १० सुरक्षित कार )

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

स्टार सिटी प्लस ही मायलेज आणि कमी बजेटसाठी चांगली पसंत केली जाते. कंपनीने ही बाईक दोन प्रकारात लॉंच केली आहे.बाईकमध्ये १०९.७ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे इंधन इंजेक्शन तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ८.१९ PS ची पॉवर आणि ८.७ Nm ची पीक टॉर्क जनरेट करते, या इंजिनसोबत ४ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे.बाईकच्या मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही बाईक ८६ kmpl चे मायलेज देते आणि ती मायलेज एआरएआयद्वारे प्रमाणित आहे.

टीव्हीएस स्टार सिटी प्लस बद्दल संपूर्ण माहिती मिळवल्यानंतर, आता जाणून घ्या कोणत्या योजनेमध्ये ही बाईक फक्त ८ हजार रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. दुचाकी क्षेत्राविषयी माहिती देणाऱ्या BIKEDEKHO या वेबसाइटवर दिलेल्या डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार, कंपनीशी संबंधित बँक या बाईकवर ७३,३६३ रुपयांचे कर्ज देईल.

( हे ही वाचा: Photo: यामाहा एरोक्स १५५; भारतातील शक्तिशाली स्कूटर! )

ज्यावर तुम्हाला किमान ८,१५२ रुपयांचे डाउन पेमेंट भरावे लागेल. या डाउन पेमेंटनंतर तुम्हाला दरमहा २,६३६ रुपये ईएमआय भरावा लागेल. या बाईकवर कर्जाचा कालावधी ३६ महिने असेल आणि बँक या कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९.७ टक्के व्याज दर आकारेल.

महत्वाची सूचना: डाऊन पेमेंट, कर्ज, ईएमआय आणि या बाईकवर उपलब्ध व्याज दर तुमच्या बँकिंगवर अवलंबून आहे. ज्यात नेगेटिव रिपोर्ट असल्यास बँक या चारमध्ये बदल करू शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buy tvs star city plus for just rs 8000 know about this special plan ttg