Tips To Buy Gold : सणासुदीच्या काळात बहूतेक लोक सोने किंवा चांदीची खरेदी करण्याचा प्रयत्न करतात कारण सणासुदीच्या काळात सोने -चांदी खरेदी करणे शुभ असते असे मानले जाते. सोन्या-चांदीचे भाव सध्या वाढत चालेले आहेत अशावेळी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्य आहे. जर तुम्ही या काळात सोने चांदी करण्याची तयारी करत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. सोने चांदी खरेदी करताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही काय काळजी घेऊ शकता.
हॉलमार्क चेक करा
सोने चांदी खरेदी करताना हॉलमार्कचे चिन्ह नक्की तपासून घ्या कारण हे चिन्ह सोन्याची शुद्धता दर्शवते. हे तपासून घ्या की सोन्याच्या दागिण्यांवर हे चिन्ह स्पष्टपण दिसत आहे.
किंमत तपासून पाहा
सोन्याचा भावामध्ये चढ-उतार होत असते. त्यामुळे बाजारात जाऊन सोने खरेदी करण्यापूर्वी आधी सोन्याची किंमत तपासून घ्या. सोन्याचे भाव कॅरेटनुसार बदलतात त्यामुळे त्यानुसार बाजारभाव माहित करून घ्या.
हेही वाचा – Children’s Day 2023: दरवर्षी १४ नोव्हेंबरला का साजरा केला जातो बालदिन? जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास
विश्वासू सोनाराकडून करा खरेदी
सोन्याची खरेदी करताना अशा सोनाराकडून खरेदी करा जो विश्वासार्ह आहे. असे केल्यामुळे नकली सोने खरेदी करण्याची शक्यता खूप कमी होते आणि तुमची कोणत्याही प्रकारे फसवणूक होत नाही. तुम्ही थेट ज्वेलरी खरेदी करण्याऐवजी आरबीआय सॉवरेन गोल्ड बॉन्ड किंवा डीजीटल गोल्ड देखील पेटीएम किंवा गुगल पेद्वारे खरेदी करू शकता.
रोख रक्कम देऊन सोने खरेदी करणे टाळा
काही लोक सोने खरेदी करताना रोख रक्कम देतात. प्रयत्न करा की रोख रक्कमेऐवजी डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केली जाते.
हेही वाचा – मुलांवर लहानपणीच करा ‘असे’ संस्कार, मोठे झाल्यावरही राहील आई-वडीलांचे कष्ट, त्याग आणि प्रेमाची जाणीव
ऑनलाइन शॉपिंग
ऑनलाइन शॉपिंग करणार आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा की, जी सुद्धा वस्तू तुम्ही घेणार आहे त्याचे पॅकिंग व्यवस्थित असावे जर तसे असेल तर तुम्हाला खराब किंवा फसवणूक केलेला माल मिळू शकतो.