आता बरेच लोक ऑनलाइन शॉपिंग पसंत करतात. त्यात फक्त शॉपिंग नाही तर त्यासोबत घरातील किराणा सामान, भाजी देखील ऑनलाइन घेतात. तरऑनलाइन औषधे खरेदी करण्याचा ट्रेंड सतत वाढत आहे. अशा परिस्थितीत, अनेक वेळा काही लोक ऑनलाइन पद्धतीने औषध खरेदी करताना अशा काही चुका करतात, ज्यामुळे त्यांना योग्य औषधाऐवजी चुकीचे औषध मिळते. आज आपण ऑनलाइन औषधे खरेदी करण्याच्या टिप्स जाणून घेणार आहोत.
१. विश्वासार्ह वेबसाइट निवडणे
सर्वप्रथम, ऑनलाइन औषध खरेदी करताना, तुम्ही विश्वासार्ह वेबसाइट निवडावी. असे केल्यास बनावट औषध खरेदी करणे टाळता येईल. याचा अर्थ, बनावट औषध टाळण्यासाठी तुमच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
आणखी वाचा : या २ राशीचे लोक असतात खूप भाग्यवान, ‘मंगळ’ ग्रहाच्या कृपेने जीवनात होतात यशस्वी
२. औषधे ऑर्डर करण्यापूर्वी कस्टमर केअरशी बोला
याशिवाय ऑनलाइन औषध ऑर्डर करण्यापूर्वी कस्टमर केअरशी नक्की बोला. त्यांच्यांशी बोलत असताना, ऑनलाइन औषधे खरेदी करण्याविषयी माहिती गोळा करा.
आणखी वाचा : “मी एका कपलसोबत ‘Throuple Relationship’मध्ये होते”; सायशा शिंदेने केला धक्कादायक खुलासा
३. डॉक्टरांना औषधे दाखवणे आवश्यक आहे
या व्यतिरिक्त तुम्ही ऑनलाइन औषध मागवता तेव्हा हे औषध तुमच्या डॉक्टरांना नक्की दाखवा जेणेकरून ते तुम्हाला योग्य औषध मिळाले आहे की नाही हे तपासू शकतील.
आणखी वाचा : “माझं कौमार्य विकून मुलगी सोनाक्षीला अभिनेत्री बनवले”, अभिनेत्रीने केला शत्रुघ्न सिन्हांवर आरोप
४. पक्के बिल घ्या
तसेच डिलिव्हरी बॉयकडून औषध घेताना पक्के बिल जरूर घ्या. हे तुम्ही ऑर्डर केलेल्या औषधांची सर्व माहिती देईल. म्हणजेच, अशा परिस्थितीत तुम्हाला कोणतीही अडचण आली तर तुम्ही कंपनीविरुद्ध तक्रारही करू शकता.