दिवाळीत लोकांचे सोने घेण्याकडे अधिक कल असते. या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री होते. सोन्याचे भावही गगनाला भिडले आहेत. सध्या ५० हजार रुपये तोळे भाव आहे. सोने महाग असल्याने ते घेताना काही बेसिक माहिती असायलाच हवी. अन्यथा भामटे खऱ्या सोन्याऐवजी खोटे सोने विकून तुमची फसवणूक करू शकतात. सोने खरे आहे की खोटे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढील माहिती फायदेशीर ठरू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१) हॉलमार्क चेक करा

हॉलमार्क नसलेले सोने खरेदी करू नका. सरकारकडून अनेकवेळा हा इशारा दिला जातो. म्हणून तुम्ही देखील सोने खरेदी करण्यापूर्वी त्याचे हॉलमार्क प्रमाणपत्र तपासा. हे प्रमाणपत्र ब्युरो ऑफ इंडियन स्टॅडर्डकडून दिले जाते.

२) व्हिनेगरचा वापर

सोन्यावर व्हिनेगरचे काही थेंब टाका. जर त्याचे सोन्यावर काही प्रभाव पडले नाही तर सोने खरे आहे. पण, व्हिनेगर टाकल्यावर सोन्याचा रंग बदलला तर ते खोटे सोने आहे.

३) चुंबकाने तपासा

सोन्यात चुंबकीय गुण नसतात. त्यामुळे, ते चुंबकाकडे आकर्षित होत नाही. पण जर तुमचे दागिने चुंबकाकडे आकर्षित होत असतील तर ते खोटे आहेत. जर ते आकर्षित नसेल होत तर ते खरे आहेत.

4) नाइट्रिक अ‍ॅसिड

नाइट्रिक अ‍ॅसिडने सोने खोटे आहे की खरे, याची माहिती मिळू शकते. यासाठी तुम्हाला दागिन्याला थोडे स्क्रॅच करावे लागेल, नंतर त्यावर नाइट्रिक अ‍ॅसिड टाकावे लागेल. सोने खरे असल्यास काही फरक पडणार नाही.