निरोगी राहण्यासाठी सर्व भाज्या खाण्याचा सल्ला तज्ञांकडुन दिला जातो. भाज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोषकतत्त्व आढळतात जी आपल्याला निरोगी राहण्यासाठी मदत करतात. तर काही भाज्या विशिष्ट आजरांसाठी औषधांप्रमाणे काम करतात. त्यामुळे अशा भाज्यांचा रोजच्या जेवणात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. त्यातीलच एक भाजी म्हणजे कोबी. कोबी खाणे काही आजरांवर फायदेशीर ठरते. कोणत्या आहेत ते आजार जाणून घ्या.
या आजारांवर कोबी खाणे ठरते फायदेशीर:
आणखी वाचा: फळं खाताना ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका; त्यामधील पोषकतत्त्व वाया घालवणाऱ्या चुका लगेच जाणून घ्या
मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी ठरते फायदेशीर
कोबी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. कोबीमध्ये असणाऱ्या ‘अँटी हायपर ग्लायसेमिक इफेक्ट’ मुळे इन्सुलिनचे प्रमाण मर्यादित प्रमाणात वाढते, यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच कोबीमध्ये विटामिन, फायबर आणि फायटोन्यूट्रियंट्स हे पोषकतत्त्व आढळतात. यामुळेदेखील रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते
जेवणाच्या चुकीच्या सवयीमुळे कोलेस्ट्रॉल लगेच वाढू शकते. कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयाचे विकार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे डॉक्टरांकडुन कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी कोबी खाणे फायदेशीर ठरते. कोबीमध्ये हाइपोकोलेस्टेरॉलिक आढळते, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
आणखी वाचा: ‘या’ आजारांमध्ये आले खाणे ठरू शकते धोकादायक; जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम
हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर
कोबीची भाजी कृसिफेरस भाज्यांच्या गटात येते. ‘नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन’च्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार कृसिफेरस भाज्यांमध्ये नैसर्गिकरित्या आइसोथियोसाइनेट्स आढळते, जे हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर मानले जाते.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)