हळूहळू थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. हिवाळा आपल्यासोबत मटार, फ्लॉवर, पालक, मुळा व गाजर यांसारख्या काही रंगीत भाज्यादेखील घेऊन येतो. त्यांमधील गाजर हे आपल्या शरीरासाठी फारच उपयुक्त ठरते. त्यामुळे हिवाळ्यात येणारे गाजर आपल्या शरीरासाठी खासकरून, वजन कमी करण्यासाठी कसे वापरता येऊ शकते ते पाहा.

हिवाळ्यात वजनावर गाजर नियंत्रण कसे ठेवते?

triphala in excess is beneficial or harmful for health
जास्त प्रमाणात त्रिफळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
Is blackcurrant and chia seed water really beneficial for health Get expert advice l काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Bad sleep Routine can increase heart disease risk losing one hour of sleep takes four days to recover
झोपेचं रुटीन बिघडलंय! फक्त एक तासाची कमी झोप तुमच्या आरोग्यासाठी ठरेल धोक्याची घंटा? तज्ज्ञांनी केला खुलासा
Lancet study finds iron calcium and folate deficiency among Indians
भारतीयांमध्ये आहे लोह, कॅल्शियम व फोलेटची कमतरता; लॅन्सेट अभ्यासाचा धक्कादायक निष्कर्ष, जाणून घ्या, तुम्ही कोणते पदार्थ खावेत?
Why will families migrate from tiger protected areas
वाघांच्या संरक्षित क्षेत्रांतील कुटुंबांचे स्थलांतरण का होणार? समस्या काय? आव्हाने कोणती?
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?

“गाजरातील बीटा कॅरोटीन [beta-carotene] नावाच्या अँटीऑक्सिडंट्समुळे गाजराला केशरी रंग प्राप्त होतो; जो शरीरासाठी व्हिटॅमिन एचे काम करतो. सोबतच गाजरामध्ये भरपूर प्रमाणात फायबरदेखील असते.” असे बंगलोरच्या आहारतज्ज्ञ डॉक्टर शीला मंगलानी [Dr. Sheela Manglani, Nutritionist] सांगतात. आरोग्य अभ्यासक व मायक्रोबायोटिक आहारतज्ज्ञ [Health Practitioner and Macrobiotic Nutritionist] शिल्पा अरोरा यांच्या मते, बद्धकोष्ठतेची कुणाला समस्या असेल, तर त्यांनी आहारात गाजराचा समावेश करावा. “गाजरामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असल्याने, ते बद्धकोष्ठतेच्या समस्येसाठी उपयुक्त ठरू शकते. त्याचसोबत गाजर हे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करून, शरीराला अतिरिक्त पाणी धरून ठेवण्यापासून रोखते. आहारात गाजराचा समावेश केल्याने हृदयाचे आरोग्यदेखील चांगले राहण्यास मदत होते.” असेही डॉक्टर अरोरा यांनी सांगितले.

हेही वाचा : शिकेकाई केसांना चमकवेलच; पण सोबत त्वचादेखील उजळेल. पाहा काय आहेत या टिप्स आणि ट्रिक्स….

गाजराचा वजन कमी करण्यासाठी नेमका कसा फायदा होतो?

गाजरामध्ये मुळातच कॅलरीजचे प्रमाण कमी असून, पोषक घटकांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुम्ही गाजर खाऊन वजन कमी करू शकता. जर तुम्ही दिवसाला १५०० कॅलरीज खात असाल, तर एक वाटी गाजरामध्ये केवळ ५० कॅलरीज असतात. जर तुम्ही गाजर उकडून खाल्लेत तरीही एका वाटीत केवळ ५४ कॅलरीज असतात. त्यामुळे तुम्हाला जर नैसर्गिकरीत्या वजन कमी करायचे असेल, तर तुमच्या डाएटमध्ये बिनधास्तपणे गाजराचा समावेश करू शकता.

गाजरामध्ये व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असून, व्हिटॅमिन एचे प्रमाण सर्वाधिक असते. अभ्यासातून जरी व्हिटॅमिन ए हे ओटीपोटावरील चरबी कमी करण्यास उपयोगी ठरू शकते, असे सांगितले जात असले तरीही त्यातून आरोग्यासाठी काही समस्याही उत्पन्न होऊ शकतात, असे समजते.

गाजर खाऊन तुम्ही एक दिवसात वजन कमी करू शकत नाही. खरे तर ते कुठल्याच गोष्टीने करता येणे जवळपास अशक्य आहे. पण गाजर किंवा इतर कोणत्याही भाज्या तुमच्या आहारातील अँटीऑक्सि़डंट्सचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे अवेळी भूक लागल्यास, रात्री-अपरात्री काही कुरकुरीत खावेसे वाटल्यास, तुम्ही गाजर खाऊ शकता. त्यामुळे तुमच्या कॅलरीज प्रमाणात राहून, वजनावर आपोआप नियंत्रण राहण्यास मदत मिळेल.

गाजरामध्ये अँटीऑक्सि़डंट्स, पोटॅशियम, के १ जीवनसत्त्व, बीटा कॅरोटीन व फायबर्स यांसारखे पोषक घटक असल्याने वजन कमी करण्याचा जर तुमचा विचार असेल, तर तुम्ही आहारात उकडलेले गाजर, कच्चे गाजर, गाजराचा रस किंवा गाजराचे सॅलड यांसारख्या पदार्थांचा वापर करू शकता.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. त्यास वैद्यकीय सल्ला समजू नये.)