Heart Attack in Winter: हृदयविकाराचा झटका हा अचानक येतो आणि वेळेवर उपचार न केल्यास प्राणघातक ठरू शकतो. सध्या हिवाळ्यात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, मात्र तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का की अंघोळ करताना एखादी चूक केल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आणखीनच वाढते. हिवाळ्यात अंघोळ करताना कोणत्या चुका करू नयेत जाणून घेऊया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिवाळ्यात आंघोळ करतेवेळी केलेली एक चुकीमुळे तुमचा जीवही जाऊ शकतो. काही लोकांना हिवाळ्यातही थंड पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते, जे चुकीचे आहे. थंड पाण्याने अंघोळ करणे हृदयासाठीही धोकादायक ठरू शकते.

गरम पाण्याने अंघोळ करा

हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करणे अधिक फायदेशीर असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीरावर कोणताही परिणाम होत नाही आणि शरीराचे तापमान स्थिर राहते. वास्तविक, गरम पाणी शरीराचे तापमान वाढवते आणि रक्ताभिसरण वाढवते.

हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ का करू नये?

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मोहालीच्या फोर्टिस हॉस्पिटलचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. करुण बहल म्हणतात, “जेव्हा आपण हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करतो तेव्हा शरीरावर काटा येतो. यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि आपले हृदय वेगाने रक्त पंप करू लागते. अशाप्रकारे हृदय रक्ताभिसरण थांबवते ज्यामुळे आपण थरथर कापू लागतो त्याने आपल्या हृदयावर दबाव देखील वाढतो. “जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयावर जास्त ताण टाकता त्यामुळे हृदयाचे अनियमित ठोके किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो,” असे डॉक्टर डॉ. बहल म्हणतात.

(हे ही वाचा: भाजलेले चणे खाल्ल्याने Blood Sugar झपाट्याने कमी होईल; खाण्याची पद्धत जाणून घ्या)

हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी काय करावे?

डॉ. बहल सांगतात की, हिवाळ्यात रक्तदाब वाढवणाऱ्या मुख्य घटकांमध्ये रक्तवाहिन्या अरुंद होणे, सूर्यप्रकाशाच्या कमी संपर्कात येणे, शारीरिक हालचाली नसणे आणि रक्त गोठणे यांचा समावेश होतो. त्यामुळे हलके अन्न खावे, उबदार कपडे घालावेत, शारीरिक हालचाल आणि व्यायाम करावा आणि हृदयाशी संबंधित कोणताही आजार असल्यास नियमित औषधे घ्यावीत. काहीवेळा उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना औषधाच्या जास्त डोसची आवश्यकता असते. म्हणूनच कार्डिओलॉजिस्टकडून डोस पुन्हा रिवाइज्ड करणे आवश्यक आहे जेणेकरून आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can cold bath cause heart attack is bathing with cold water in winter harmful gps