बीटमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात, म्हणूनच बहुतेक डॉक्टर आपल्याला बीट खाण्याचा सल्ला देतात. त्यात लोह, पोटॅशियम आणि फोलेट सारखे पोषक घटक आढळतात, जे तुमच्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहेत. परंतु मधुमेहाच्या रुग्णांना त्याचा फायदा होण्याच्या उद्देशाने ते खाऊ शकतात का? जाणून घेऊयात….
मधुमेहाच्या रुग्णांनी बीट खावे की नाही?
बीटची चव गोड असते. त्यामुळे बीट खावे की नाही या संभ्रमात मधुमेही रुग्ण नेहमी असतात. तर बीटमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळतात, म्हणून बीट मधुमेहाच्या रुग्णांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते, त्यात ते मर्यादित प्रमाणात खावे. चला तर मग जाणून घेऊयात त्याचे फायदे…..
बीट खाण्याचे ४ फायदे
उच्च रक्तदाब कमी होणे
मधुमेहाच्या रुग्णांना अनेकदा उच्च रक्तदाबाचा त्रास सहन करावा लागतो. याकरिता बीट खाल्ल्याने किंवा त्याचा रस पिऊन रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो.
पोटाच्या समस्यांपासून आराम
मधुमेहाच्या रुग्णांनी जेवणापूर्वी बीट जरूर खावे, त्यामुळे शरीराला नैसर्गिक साखर तर मिळतेच, पण पचनक्रियाही चांगली राहते. हे रक्तातील साखरेची पातळी देखील वाढवत नाही.
इतर अनेक रोगांपासून मिळेल संरक्षण
मधुमेह हा आजार भारतातील एक सामान्य समस्या बनली आहे, परंतु मूत्रपिंड आणि हृदयासारख्या महत्त्वाच्या अवयवांवर त्याचा परिणाम होत असल्याने इतर अनेक रोगांचे मूळ मानले जाते. अँटिऑक्सिडंटने भरलेले बीट खाल्ले तर मधुमेहामुळे होणारा त्रास कमी होऊ शकतो.
रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात
बीटमध्ये नैसर्गिक साखर असते, त्यामुळे ते तुमच्या शरीराला हानी पोहोचवत नाही. मधुमेहाच्या रुग्णांनी खाण्यापूर्वी बीटचे सेवन करावे, यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि भरपूर ऊर्जाही मिळते.