चेहऱ्यावर सूज येणे या समस्येने अनेक जण त्रस्त असतात. त्वचेला कोणतीही ऍलर्जी झाली किंवा इन्फेकशन झाले तर लगेच चेहऱ्यावर सूज येते. किंवा एखादी मुंगी किंवा किटक चावल्याने देखील लगेच चेहऱ्यावर सूज येते. अशा काही कारणांमुळे चेहऱ्यावर सूज येते, अशावेळी ही सूज लगेच कमी करण्यासाठी बर्फाने शेकण्याचा किंवा आईस फेशियल करण्याचा सल्ला दिला जातो. पण बर्फ सूज कमी करण्यासाठी खरचं फायदेशीर ठरतो का? यावरील तज्ञांचे मत जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डर्मिटोलॉजिस्ट डॉक्टर गुरवीन वारैच यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे बर्फाने शिकण्याचे काही फायदे आहेत, पण यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

आणखी वाचा : मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात करावा ‘या’ गोष्टींचा समावेश; Blood Sugar नियंत्रणात ठेवण्यासाठी होईल मदत

चेहऱ्यावर बर्फ लावल्याने तिथल्या त्वचेवर असणारे लिम्फचे पोअर्स (लहान छिद्र) उघडतात, ज्यामुळे सूज लगेच कमी होते. बर्फाने शेकल्याने चेहऱ्यावरील पोअर्स (लहान छिद्र) आकुंचन पावतात. याला व्हॅसोकॉन्स्ट्रक्शन म्हणतात. मेकअप करण्याआधी अनेकजण चेहऱ्यावर बर्फाने शेकतात, असे केल्याने चेहऱ्यावर असणारी सूज नाहीशी होते. पण चेहऱ्यावर बर्फाने शेकताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते.

चेहऱ्यावर बर्फाने शेकताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • बर्फ थेट चेहऱ्यावर लावू नका, आधी तो कॉटनच्या कपड्यात गुंडाळून त्यानंतर चेहऱ्यावर लावा.
  • एकाच जागेवर जास्त वेळ बर्फ लावू नका, संपुर्ण चेहऱ्यावर बर्फ लावा.
  • चेहऱ्यावर एका जागी ५ सेकंदपेक्षा जास्त वेळ बर्फ लावू नका.
  • चेहऱ्यावर बर्फाने शेकण्यासाठी सकाळची वेळ उत्तम असते.
  • आधी ५ सेकंद, नंतर ३ सेकंद आणि त्यानंतर ५ मिनिट अशा कालावधीसाठी चेहऱ्यावर बर्फ लावा. ही प्रक्रिया ८ ते १० वेळा करू शकता, त्यापेक्षा जास्त वेळा करणे टाळा.