Breast Cancer: ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांमध्ये भयंकर आजार झाला असून, वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलांचा मृत्यूही होऊ शकतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, स्तनाच्या कर्करोगाने पीडित महिलांची संख्या दरवर्षी वाढत आहे. जेव्हा स्तनामध्ये अधिक पेशी तयार होऊ लागतात तेव्हा स्तनाचा कर्करोग सुरू होतो आणि याच पेशींची नंतर गाठ बनते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यामुळे महिला स्तनाच्या कर्करोगासारख्या भयंकर आणि गंभीर आजारांना बळी पडतात. आपल्या सर्वांना माहीत आहे की, स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये खराब जीवनशैली आणि खराब आहार यांचा समावेश आहे. पण तुम्हाला माहित आहे का की त्वचेवर तीळ असण्यामुळे महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग देखील होऊ शकतो. स्तनाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारासाठी तीळ खरोखरच जबाबदार आहे का ते जाणून घेऊया.

(हे ही वाचा: Blood Sugar Control: रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने डोळ्यांचे ४ आजार होऊ शकतात; जाणून घ्या यांना कसे टाळावे)

तीळ आणि स्तनाचा कर्करोग यांच्यातील संबंध (Relation between moles and breast cancer)

स्तनाच्या कर्करोगावरील अनेक अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की ज्या महिलांच्या शरीरावर सामान्य तिळांपेक्षा जास्त तीळ असतात त्यांना रजोनिवृत्तीपूर्व स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. याशिवाय, फ्रान्समध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, ज्यामध्ये सुमारे ८९,९०२ महिलांवर तीळविषयी संशोधन करण्यात आले. यामध्ये सुमारे ५,९५६ महिला स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त असल्याचे आढळून आले. दुसरीकडे, ज्या महिलांच्या शरीरावर कमी तीळ होते त्यांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी असल्याचे दिसून आले.

स्तनाच्या कर्करोगाचे तीळ कसे दिसतात (How cancerous moles look like )

कॅन्सर तज्ज्ञांच्या मते, महिलांच्या शरीरावरील तीळ जे नंतर स्तनाच्या कर्करोगाचे कारण बनतात. हे सामान्य दिसणाऱ्या तीळापेक्षा काहीसे वेगळे असतात. त्यामुळे हे तीळ ओळखणे फार महत्वाचे आहे. हे तीळ सामान्य दिसणार्‍या तीळापेक्षा कसे वेगळे आहेत आणि हे ओळखून हा गंभीर आजार कसा टाळता येईल हे जाणून घेऊया.

( हे ही वाचा: भारताने बनवली गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस; जाणून घ्या किती असेल खर्च)

आकार

कर्करोगग्रस्त तीळचा आकार सामान्य तीळच्या आकारापेक्षा वेगळा असू शकतो.

रंग

अनेक अभ्यासानुसार कर्करोगग्रस्त तीळ अनेक रंगांमध्ये आढळले आहेत. ज्यामध्ये फिकट गुलाबी, काळा, पांढरा आणि राखाडी असे मुख्य रंग सापडले आहेत.

बदल

बर्‍याचदा काही काळानंतर कर्करोगाच्या तीळांमध्ये बदल दिसून येतात. ज्यामध्ये ते काही आठवडे किंवा महिन्यांनंतरच वेगळे दिसू लागतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can mole be the reason for breast cancer in women gps