आधुनिक जीवनशैलीमध्ये पौष्टिक अन्न कमी खाल्ले जाते. यामुळे बहुतांशी लोक ‘प्रोटीन पावडर’, ‘प्रोटीन शेक’ याच्यावर अवलंबून असतात. त्यातही ‘वर्कआऊट’ करणारे, व्यायामशाळेत म्हणजेच ‘जिम’मध्ये जाणारे ‘प्रोटीन पावडर’ नियमित घेतात. परंतु, वर्कआऊट करत नसताना अतिरिक्त प्रोटीन्स घेणे योग्य आहे किंवा नाही, तसेच ‘प्रोटीन पावडर’ची आवश्यकता किती आहे, हे जाणून घेणे आवश्यक ठरेल.

प्रोटीन पावडरचा वापर हा सामान्यतः पूरक घटक (सप्लिमेंट) म्हणून केला जातो. वर्कआऊट करणाऱ्या लोकांना अतिरिक्त प्रोटीन्सची आवश्यकता भासू शकते. आधुनिक जीवनशैलीत आहाराच्या वेळा, आहाराच्या पद्धती यामध्ये बदल झाले आहेत. जंकफूडची अनेकांना सवय असल्यामुळे आवश्यक प्रथिने आहारातून मिळत नाहीत. म्हणूनसुद्धा ‘प्रोटीन पावडर’ घेतली जाते. या पावडरमुळे दैनंदिन आहारातील प्रथिनांची गरज पूर्ण होते.
स्नायूंची मजबुती, त्यांची कार्यक्षमता, शरीराची रचना यासाठी ‘प्रोटीन पावडर’ उपयुक्त ठरते. वर्कआऊट करत नसताना अतिरिक्त प्रथिन्यांची आवश्यकता असते का किंवा प्रोटीन पावडर घेण्याची गरज आहे का, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Make Kabuli Chana Kebabs in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा काबुली चन्याचे कबाब; वाचा साहित्य आणि कृती
martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
IND vs AUS Boxing Day Test Virat Kohli and Sam Konstas argument video viral
IND vs AUS : विराट आणि सॅम कॉन्स्टास यांच्यात झाली धक्काबुक्की! पंचांसह ख्वाजाला करावी लागली मध्यस्थी, पाहा VIDEO
50 percent vacancies in FDA, FDA, drug licensing,
‘एफडीए’मध्ये ५० टक्के पदे रिक्त, औषध परवाना व औषध तपासणीवर परिणाम

हेही वाचा : पावसाळ्यात महिलांच्या आरोग्याला धोका अधिक असतो का ?

आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांच्या मते, वर्कआऊट करणाऱ्यांसाठी प्रोटीन पावडर आवश्यक आहे. परंतु, शारीरिक हालचाली कमी आहेत, व्यायाम करत नाहीत, तेसुद्धा प्रोटीन पावडर घेऊ शकतात. परंतु, त्यासाठी काही नियम लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
तुम्ही वापरत असलेल्या पावडरमधील प्रथिनांचे प्रमाण विचारात घ्या. तुमचे राहणीमान, आहार आणि आवश्यक प्रथिने यांचा विचार करून मग अतिरिक्त प्रोटीन पावडर घ्यायची की नाही हे ठरवा. अतिरिक्त प्रथिने पचवण्यासाठी शारीरिकदृष्ट्या कार्यक्षम राहा. शारीरिक हालचालीही आवश्यक आहेत. प्रथिन्यांसह फायबरयुक्त आहार ठेवा.
कामिनेनी हॉस्पिटल, हैदराबादच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ एन लक्ष्मी यांनी सांगितले की, तुम्ही व्यायाम करत नसतानाही तुम्ही प्रोटीन पावडर घेऊ शकता. “प्रोटीन पावडर सामान्यतः आहारातील पूरक म्हणून वापरली जाते. तुमच्या दैनंदिन प्रथिनांच्या गरजा पूर्ण होतात. ते सहसा ऍथलीट्स आणि वर्कआऊट करणाऱ्या लोकांशी संबंधित असली तरी कोणीही प्रथिने पूरक घटक म्हणून घेऊ शकतात. जे बैठी जीवनशैली जगतात, ‘डेस्क जॉब’ करतात तेही प्रोटीन पावडर आवश्यकता असल्यास घेऊ शकतात.

हेही वाचा : राजकीय नेते ‘बडव्यां’चा उल्लेख करतात, हे ‘बडवे’ म्हणजे कोण ? काय आहे बडव्यांचा इतिहास


प्रोटीन पावडर प्रथिनांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, पेशींच्या पुनर्निर्माणासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि संप्रेरक उत्पादनासाठी आवश्यक आहेत. वर्कआऊट्सनंतर प्रोटीन पावडर ही ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी तसेच शरीराच्या पुनर्भरणासाठी आवश्यक असते. वजन वाढवण्यासाठी, वजन व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी प्रोटीन पावडर आवश्यक आहे.
काहींना दुग्धजन्य पदार्थ किंवा अंडी अशा पदार्थांची ऍलर्जी असते किंवा ते पदार्थ खाऊ शकत नाहीत. अशा वेळी प्रोटीन पावडर उपयुक्त ठरते. पण, प्रोटीन पावडर घेताना ब्रँडचा विचार करा.

हेही वाचा : रोमन काळापासून विकसित झालेली बिकिनी; काय आहे बिकिनीचा इतिहास


यशोदा हॉस्पिटल्स, हैदराबादचे डॉ. कमलेश ए. म्हणाले की, प्रोटीन पावडर उपयुक्त आहेच. परंतु, तिचे जास्त प्रमाणात सेवन हे पोटदुखी, डोकेदुखी, मळमळ यांना कारणीभूत ठरू शकते. प्रोटीन पावडर निवडताना त्यातील घटकांचा विचार करा. सुरक्षितता आणि अन्न प्रशासनाच्या प्रमाणपत्रांचा विचार करा. प्रोटीन पावडर अतिरिक्त प्रमाणात घेऊ नका. ज्यांना यकृत, मूत्रपिंड, पोटाचे विकार आहेत त्यांनी प्रोटीन पावडर सहसा घेऊ नये. प्रोटीन पावडर घेऊन झाल्यावर पाण्याचेही योग्य सेवन करा.

प्रोटीन पावडर आवश्यक आणि पूरक घटक म्हणून कोणीही निरोगी व्यक्ती घेऊ शकते. आरोग्याच्या समस्यांमुळे ज्यांना प्रोटीन पावडर घ्यायची आहार, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Story img Loader