आपल्यापैकी बरेच जण वजन कमी करण्यासाठी विविध आहार योजना आणि व्यायाम करत राहतात, तरीही वजन कमी होत नाही. असे घडते कारण आपण हे विसरतो की कोणत्याही फिटनेस ध्येयापर्यंत पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमचा आहार आणि तुमचा व्यायाम आहे. फिटनेस ट्रेनर सिमरन वलेचा यांनी इंस्टाग्रामवर वजन कमी करण्याची काही माहिती शेअर केली आहे की दररोज एक तास चालणे देखील आपल्याला कॅलरी बर्न करण्यास कशी मदत करू शकते. चालण्याने तुम्ही जेवढ्या कॅलरी वापरता त्यापेक्षा जास्त कॅलरी बर्न करता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुलींना अनेकदा जिमसाठी वेळ काढता येत नाही, त्यांच्यासाठी चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. चालण्याद्वारे दरमहा २-३ किलो वजन कमी करणे कठीण नाही. तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमचा आहार बदलला पाहिजे आणि दररोज चालले पाहिजे. जर तुम्ही आहारात कार्बोहायड्रेट किंवा साखर वगळल्यास, इतर सर्व पदार्थ खात असाल आणि दररोज चालत असाल, तर तुम्ही सहजपणे २००-३०० कॅलरीजची बर्न करू शकता.

दररोज चालण्याने वजन कसे कमी होते?

तज्ज्ञांच्या मते, चालणे हा सर्वात उत्तम व्यायाम मानला जातो, हा व्यायाम शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे.

( हे ही वाचा: अंडी खाल्ल्याने हार्ट अटॅक, बीपी झपाट्याने कमी होईल? आठवड्यातून किती करावे सेवन जाणून घ्या)

तज्ञांच्या मते, एक तास चालणे म्हणजे ५,५००-६,५०० स्टेप्स. फिटपाठशालेचे सहसंस्थापक रचित दुआ यांनी indianexpress.com ला सांगितले की शरीरातील फॅट बर्न करणे, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारणे, तणाव कमी करणे यासह शरीराचे एकूण आरोग्य सुधारण्यासाठी चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे. तज्ज्ञांच्या मते, तुमची फिटनेस पातळी सुधारण्यासाठी तुम्ही दररोज ६-१० हजार पावले चालली पाहिजेत. तुम्ही चालत असताना तुमची पावले मोजण्यासाठी तुम्ही स्टेप ट्रॅकर बँड किंवा घड्याळे वापरू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can walking for an hour daily help you lose 2 3 kgs every month know expert tips to control weight by walk gps