Applying Coconut Oil On Skin After Bath : नारळाचे तेल दाट आणि छान केसांसाठी वापरले जाते. आपल्या आई, आजींनी नेहमीच केस आणि त्वचेसाठी हे तेल वापरण्यावर भर दिला आहे. पण, आतापर्यंत तुम्ही फक्त केस आणि त्वचेसाठी नारळाच्या तेलाचा फायदा कसा होतो हे पाहिले असेल. पण, अंघोळीनंतर नारळाचे तेल लावण्याचे फायदे आम्ही तुम्हाला या बातमीतून सांगणार आहोत…
अंघोळीनंतर नारळाचे तेल लावण्याचे पाच फायदे (Five Benefits Of Applying Coconut Oil After Your Bath)
१. त्वचेचे किरणांपासून संरक्षण करणे (Protects Skin From UV Rays)
साधारणपणे १० ते ११ महिन्यांच्या नारळ खोबऱ्याच्या किसापासून दूध काढून ते शिजवल्यानंतर जे तेल प्राप्त होते, त्याला व्हर्जीन कोकोनट ऑइल म्हणतात. रिसर्चगेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, व्हर्जीन कोकोनट ऑइल हे ऑइल अँटिऑक्सिडंट म्हणून वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक घटकांपैकी एक आहे, कारण त्यात जास्त प्रमाणात संतृप्त फॅटी ॲसिड असतात, ज्यामुळे व्हर्जीन कोकोनट ऑइल ऑक्सिडेशनला प्रतिरोधक ठरते. अशा प्रकारे नारळाचे तेल त्वचेच्या किरणांपासून संरक्षण करते आणि किरणांमुळे सुरकुत्या आणि काळे डाग पडण्याची शक्यता कमी असते.
२. त्वचेला मॉइश्चरायझिंग करणे (Skin Moisturising)
आपल्यापैकी बहुतेकांना अंघोळीनंतर कोरड्या त्वचेचा सामना करावा लागतो आणि बाजारात उपलब्ध असलेले मॉइश्चरायझर्स तेवढे प्रभावी नसतात, जितके ते असल्याचा दावा केला जातो. पण, नारळाचे तेल हे एक उत्तम मॉइश्चरायझर आहे, जे त्वचेला पोषण देऊ शकतात आणि दीर्घकाळ मऊपणा देऊ शकतात; असे नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात म्हटले आहे. याव्यतिरिक्त, कोरडी त्वचा, खाज सुटणे आणि लालसरपणा आदी अनेक समस्या टाळण्यास मदत होते.
३. जखम बरी करणे (Healing Of Wounds)
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, व्हर्जीन कोकोनट ऑइल जखम बरी करण्यास मदत करतात. पेप्सिन विरघळणारे कोलेजनच्या उपस्थितीमुळे व्हर्जीन कोकोनट ऑइलने उपचार केलेल्या जखमांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली, जी कोलेजन क्रॉस-लिंकिंगचे प्रमाण जास्त असल्याचे दर्शवते. जर तुमच्या शरीरावर कोणत्याही जखमा असतील तर अंघोळीनंतर नारळ तेल लावल्याने त्या बरं होण्यास मदत होईल.
४. रक्तप्रवाहात वाढ (Boost Blood Flow )
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, नारळाचे तेल अंघोळीनंतर मसाज क्रीम म्हणून वापरले जाऊ शकते. यामुळे रक्तप्रवाह वाढतो, तणावमुक्ती उत्तेजित होते; ज्यामुळे शरीराच्या मालिशसाठी हा खास उपाय ठरतो.
५. वृद्धत्व रोखते (Prevents Ageing)
अंघोळीनंतर शरीरावर नारळाचे तेल लावल्याने बारीक रेषा आणि सुरकुत्या यांसारख्या वृद्धत्वाच्या खुणा टाळता येतात, यामुळे तुम्ही तरुण दिसता.