National No Bra Day 2023 : 13 ऑक्टोबर हा दरवर्षी ‘नॅशनल नो ब्रा डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महिला ब्रा घालत नाही. स्तन हा महिलांच्या शरीरावरील महत्त्वाचा भाग आहे. अशावेळी ब्रा ही महिलांच्या कपड्यांधील महत्त्वाचे अंतर्वस्त्र मानले जाते. खरं तर ब्रा घालावी की नाही ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण अनेकदा महिलांना प्रश्न पडतो की आपल्या स्तनाच्या आरोग्यासाठी ब्रा घालणे, गरजेचे आहे का की ब्रा घालणे बंद करू शकतो? आज आपण या विषयीच सविस्तर जाणून घेऊ या.
सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका महिला डॉक्टरांनी ब्रा घालावी की नाही आणि त्याचा आरोग्यावर परिणाम होतो का? याविषयी सांगितले आहे.
या व्हायरल व्हिडीओत डॉ. तनया सांगतात, ” ब्रा घालणे किंवा न घालणे याचा आरोग्यावर काहीही परिणाम होत नाही. हा एक फॅशनचा प्रकार आहे.” त्या पुढे सविस्तरपणे सांगतात, “ही आपली वैयक्तिक निवड आहे. काही महिलांना ब्रा घातल्यानंतर आपण सुंदर दिसतो, असे वाटते तर काही क्रिडा क्षेत्रात असलेल्या महिलांना ब्रा घातल्याशिवाय खेळणे, अशक्य वाटते.”
हेही वाचा : दीवानी हाँ दीवानी…तरुणाचे जबरदस्त ठूमके पाहून दीपिका पदूकोणलाही विसराल; VIDEO होतोय व्हायरल
डॉ. पुढे सांगतात, “जर कुणाला घालायची इच्छा असेल तर घालावी ज्यांना ब्रा घालायला आवडत नाही, त्यांनी घालू नये. ब्रा न घातल्याने तुमचे स्तन चांगले दिसणार नाही, असे नाही किंवा अंडरवायर ब्रा आणि ब्लॅक ब्रा मुळे तुम्हाला कॅन्सरसुद्धा होणार नाही. खरं तर ब्रा घालणे किंवा न घालणे हा आपल्या आवडी निवडीचा एक भाग आहे”
dr_cuterus या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन डॉ. तनया यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरंच खुप गरजेचा विषय तुम्ही मांडला. आम्हाला आवश्यक माहिती मिळाली.” तर एका युजरने लिहिलेय, “तुम्ही खूप चांगले काम करत आहात. नक्कीच यामुळे लोकांना मदत होईल. असेच व्हिडीओ बनवत राहा”