How much eat per day Garlic लसूण हा असा मसाल्याचा पदार्थ आहे जो प्रत्येकाच्या घरी दररोज वापरला जातो. तसंच लसूण हा भाजीत किंवा एखाद्या पदार्थात मिक्स केल्यावर त्या पदार्थाला आणखी भारी चव येते. लसूण फक्त पदार्थांमध्ये टेस्ट आणण्याचंच काम करत नाही तर सोबतच लसूणमध्ये अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक रोग होण्याचा धोका टळतो. शरीराला अनेक रोगांपासून वाचवण्यासाठी लसणाचा अधिकाधिक वापर अन्नात केला जातो. लसणाशिवाय भारतीय जेवण अपूर्ण मानले जाते. लसूण केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. मात्र तुम्हाला माहितीये का, लसणाचे जास्त सेवन शरीरासाठी घातक ठरू शकते. इतके फायदे असूनही लसूणचे काही तोटे देखील आहेत, म्हणून ते मर्यादित प्रमाणात खावे.

यकृतासाठी धोकादायक

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Which of the raw and pasteurized milk is beneficial
कच्चे व पाश्चराइज्ड यापैकी कोणते दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून…
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
What is the Leidenfrost effect
Leidenfrost Effect : जेवण बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा पॅन वापरताय? मग नक्की जाणून घ्या ‘या’ हॅकबद्दल
Seaweed imports What is the use of the element What is the benefit of this decision of the central government
चक्क समुद्र शैवालाची आयात? या घटकाचा उपयोग काय? केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किती फायदा?
Coconuts Are Not Allowed On Planes
Coconuts Are Not Allowed On Planes : विमान प्रवासात नारळ घेऊन जाण्यावर का आहे बंदी? वाचा नियम, तोटे अन् तज्ज्ञांचे मत
mayonnaise food poisoning banned
‘या’ राज्याने मेयोनीजवर बंदी का घातली? मेयोनीज शरीरासाठी खरंच घातक आहे का?

जास्त प्रमाणात लसूण खाणे यकृतासाठी धोकादायक ठरू शकते. कारण कच्च्या लसणात अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप जास्त असते. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने यकृत विषारी होऊ शकते.

खराब पोट

रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते. तुम्हीही रिकाम्या पोटी लसूण खात असाल तर सावधान. कारण ते जास्त खाल्ल्याने लूज मोशन होऊ शकते.

पोटाशी संबंधित समस्या

रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने पोटाचे विकार होऊ शकतात. पोट फुगणे, आम्लपित्त सारखे. तसेच पचनाची समस्या असल्यास लसूण खाणे टाळावे.

छातीत जळजळ

लसूण खाल्ल्याने मळमळ, उलट्या आणि छातीत जळजळ होऊ शकते. लसणात काही खास गुणधर्म असतात ज्यामुळे ॲसिडिटी होते.

रक्त पातळ करते

लसूण रक्त पातळ करण्याचेही काम करते. त्यामुळे रक्तस्रावाची समस्या वाढते. जर तुम्ही रक्त पातळ करणारे औषध घेत असाल तर लसूण कमी प्रमाणात खा.

ऍलर्जी होऊ शकते

लसूण जास्त खाल्ल्याने ऍलर्जी होऊ शकते. त्यामुळे त्वचेवर रॅशेस दिसू लागतात आणि त्वचा जळू लागते.

हेही वाचा >> चेहऱ्यावर एक डाग राहणार नाही; टोमॅटोचा वापर करून मिळवा सुंदर त्वचा, जाणून घ्या ४ घरगुती फेस पॅक

तोंडाचा तीव्र वास

लसूण गरम असतो, त्यामुळे थंडीशी संबंधित आजारात लोक त्याचं सेवन करतात, पण काही लोक ते जास्त प्रमाणात खाऊ लागतात. यामुळे तोंडाचा तीव्र वास येतो, ज्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो, म्हणून मर्यादित प्रमाणात त्याचे सेवन करा.