Blood Sugar Control: मधुमेह हा एक गंभीर आणि सामान्य होत असलेला आजार आहे. कधीकधी अशी परिस्थिती असते जेव्हा एखाद्या व्यक्तीची रक्तातील साखरेची पातळी जास्त असते परंतु त्या व्यक्तीला मधुमेहाचा रुग्ण म्हणता येणार नाही. या स्थितीला प्री-डायबेटिस म्हणतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्री-डायबिटीज समजून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासली पाहिजे. WHO च्या अहवालानुसार, जर फास्टिंग ब्लड ग्लुकोज शुगर करणार्‍या रक्तातील ग्लुकोज खाल्ल्यानंतर २ तासांनी ५.६– ६.९ mmol/L किंवा ७.८ – ११.० mmol/L ब्लड शुगर असेल तर याचा अर्थ तुम्हाला प्री-डायबिटीज आहे. डब्ल्यूएचओच्या मते, आहार आणि व्यायामाच्या सवयी वेळेत सुधारल्या नाहीत तर प्री-डायबिटीज असलेल्या बहुतेक लोकांना पुढील दहा वर्षांत टाइप २ मधुमेह विकसित होईल. आता प्रश्न असा आहे की प्री-डायबेटिस पुर्णपणे संपवता येईल का?

आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार म्हणतात की अशा अनेक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहेत ज्या प्री-डायबिटीस रिवर्स करण्यात आणि साखरेची पातळी नियंत्रित करून टाइप २ आणि टाइप १ मधुमेह टाळण्यास मदत करू शकतात.

( हे ही वाचा: युरिक ॲसिडची पातळी झपाट्याने कमी होईल; फक्त ‘या’ ४ पदार्थांचा आहारात समावेश करा)

मेथीच्या दाण्यांचे सेवन

मेथीची चव कडू आणि गरम असते आणि हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. मधुमेह, लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉलसाठी ही एक उत्तम आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हे वेगाने वाढणारी रक्तातील साखर कमी करते, ग्लुकोज इंटोलरेंस सुधारते आणि एकूण कोलेस्ट्रॉल, एलडीएल आणि ट्रायग्लिसराइड्स देखील कमी करते.

मेथीचा वापर कसा करावा

१ चमचे (५ ग्रॅम) मेथी पावडर रिकाम्या पोटी किंवा झोपेच्या वेळी कोमट पाण्यासोबत घ्या. दुसरा उपाय म्हणजे रात्री एक चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत घ्या.

काळी मिरीचे सेवन

हे इंसुलिन इंटोलरेंस आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यात ‘पाइपेरिन’ नावाचा महत्त्वाचा घटक असतो जो रक्तातील साखर नियंत्रित करतो.

( हे ही वाचा: ‘हे’ आयुर्वेदिक उपाय ट्राय करा; खराब कोलेस्ट्रॉल पासून कायमस्वरूपी सुटका मिळेल)

काळी मिरी कशी वापरावी

काळी मिरी वापरण्यासाठी १ काळी मिरी (ठेचून) मध्ये १ चमचे हळद मिसळा. हे मिश्रण तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्रीच्या जेवणाच्या १ तास आधी घेऊ शकता. तिखट चव कमी करण्यासाठी तुम्ही त्यात थोडे मध घालू शकता.

दालचिनीचे सेवन

हे इंसुलिन इंटोलरेंस कमी करते आणि जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. हे अतिरिक्त चरबी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे.

दालचिनीचा वापर कसा करावा

अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मेथी पावडरमध्ये १ चमचा दालचिनी मिसळा आणि रिकाम्या पोटी घ्या. तुम्ही दालचिनीच्या छोट्या तुकड्याने हर्बल चहा बनवून पिऊ शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can you reverse prediabetes permanently home remedies to control blood sugar gps