जगभरात दरवर्षी कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कर्करोग त्याच्या लक्षणांवरून प्रामुख्याने ओळखला जातो. परंतु काही वेळा काही रुग्णांमध्ये सुरुवातीची लक्षणे दिसत नाहीत, तरीही ते कर्करोगाचे बळी ठरलेले दिसतात. पण आता कॅन्सर स्क्रीनिंगच्या इतिहासात एक मोठी प्रगती झाली आहे, जी वैद्यकीय विज्ञानासाठी गेम चेंजर ठरू शकते. शास्त्रज्ञांना रक्त तपासणीद्वारे अनेक रुग्णांमध्ये कर्करोग आढळून आला आहे. त्यांच्यापैकी कोणालाही कर्करोगाची लक्षणे दिसून आली नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॅन्सर स्क्रीनिंग सुधारण्यासाठी काम करणाऱ्या GRAIL या हेल्थकेअर कंपनीने हे संशोधन केले आहे. यामध्ये ६६६२ व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. हे सर्व लोक पन्नास वर्षे व त्याहून अधिक वयाचे होते. या संशोधनाचे परिणाम पॅरिसमधील युरोपियन सोसायटी फॉर मेडिकल ऑन्कोलॉजी (ESMO) काँग्रेस २०२२ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. या संशोधनात सहभागी असलेल्या १ टक्के लोकांमध्ये कर्करोग आढळून आला आहे. या बहु-कर्करोग लवकर शोधण्याच्या चाचणीद्वारे या रक्त चाचण्या केल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये कर्करोगाच्या लक्षणे नसलेल्या रुग्णांमध्येही हा आजार आढळून आला आहे.

( हे ही वाचा: Uric Acid Diet Plan: यूरिक ऍसिड नियंत्रित करून सांधेदुखीपासून मुक्त होण्यासाठी ‘हा’ Diet Plan करेल मदत; जाणून घ्या)

लक्षणे नसलेल्या रुग्णांचीही माहिती मिळेल

ग्रेलचे एमडी, मुख्य वैद्यकीय अधिकारी जेफ्री वेनस्ट्रॉम यांनी सांगितले की, ९२ रुग्णांना कर्करोगाचे निदान झाले आहे आणि यापैकी ३५ रुग्णांना अनेक प्रकारच्या कर्करोगाची पुष्टी झाली आहे. कंपनीने उघड केले की पुष्टी झालेल्या कर्करोगांपैकी, ७१ टक्के रुग्णांना असे कर्करोग आहेत ज्यांच्या चाचण्या सहज उपलब्ध नाहीत. आता या चाचणीद्वारे लोकांची कॅन्सर तपासणी सहज करता येणार आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये कॅन्सरची लक्षणे नसली तरीदेखील या चाचणीद्वारे हा आजार सहज ओळखता येईल.

कॅन्सर स्क्रीनिंग सहज करता येते

नवीन चाचणीमुळे कॅन्सर स्क्रीनिंग वाढेल आणि अपेक्षेपेक्षा चांगले उपचार धोरण ठरेल अशी अपेक्षा आहे. संशोधनात सामील असलेल्या लोकांची इमेजिंग प्रक्रियेद्वारे चाचणी घेण्यात आली. जसे की स्कॅन किंवा एमआरआय पद्धतीने. अभ्यासामध्ये ११ विविध प्रकारचे कर्करोग आढळले, ज्यांची आज कोणतीही मानक तपासणी नाही.

( हे ही वाचा: Weight Control Tips: थायरॉईडमुळे फक्त वजनच वाढत नाही तर ‘हे’ ६ गंभीर आजारही होऊ शकतात; जाणून घ्या नियंत्रणासाठी टिप्स)

नवीन चाचणी तंत्रज्ञानाद्वारे कर्करोगाचे सहज निदान करता येते. जर रुग्णाला कोणतीही लक्षणे दिसत नसतील, परंतु तो हाई रिस्क ग्रुपमध्ये असेल, तर या तंत्राचा वापर केला जाऊ शकतो, ज्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांची संख्या आणि या आजारामुळे होणारे मृत्यू कमी होतील.