सिगारेटचे व्यसन सोडण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामध्ये आणखी एकाची नव्या संशोधनामुळे भर पडलीये. सिगारेट सोडल्यास संबंधित व्यक्तीला चांगली झोप लागू शकते, असे संशोधनातून आढळून आले.
सिगारेट ओढण्याचे व्यसन असलेल्या व्यक्तीने दिवसातून एकदा ती ओढल्यास त्याची झोप १.२ मिनिटांनी कमी होते. ज्याप्रमाणे तो दिवसातून एकापेक्षा जास्त सिगारेट ओढतो, त्याचप्रमाणे त्याची झोप कमी कमी होत जाते, असे संशोधकांना आढळले. सिगारेटचे स्त्री-पुरुषांच्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होत असतात. त्याबद्दल याआधीही अनेक संशोधने झालेली आहेत. मात्र, सिगारेट ओढण्याचा आणि व्यक्तीच्या झोपेचा काही संबंध असतो का, यावर फारशी संशोधने झालेली नाहीत. फ्लोरिडा विद्यापीठ आणि रिसर्च ट्रायंगल पार्क यांनी संयुक्तपणे सिगारेटच्या व्यसनाचा आणि झोपेवर होणारा परिणाम याबाबत संशोधन केले. यासाठी त्यांनी देशभरातून नुमना सर्वेक्षण गोळा केले होते.
सिगारेट ओढणाऱयांपैकी ११.९ टक्के लोकांना निद्रानाशाचा त्रास होतो आहे. यापैकी १०.६ टक्के लोकांना रात्री झोपेतून जाग येते तर ९.५ टक्के लोकांना पहाटे खूप लवकर जाग येते. याचवेळी हे व्यसन नसणाऱया व्यक्तींना असा त्रास होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ज्या लोकांनी सिगारेट ओढण्याचे व्यसन सोडून दिले, त्यांचा निद्रानाशाचा त्रास कमी झाल्याचेही आढळून आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा