वेलचीचा सुगंध, आणि चव याविषयी सर्वांनाच माहिती आहे, पण वेलची केवळ चव दुप्पट करत नाही, तर आरोग्यालाही अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. हे सिद्ध झाले आहे की वेलची ही पोषक तत्वांचा खजिना आहे, ज्यापासून अनेक आजारांवर उपचार केले जातात. तर वेलचीच्या सेवनाने तोंडाची दुर्गंधी तर दूर होतेच पण सर्दी-खोकला, पचनाच्या समस्या, उलट्या, लघवीशी संबंधित समस्याही कमी होतात.

वेलचीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीरातील रक्त परिसंचरण नेहमी सामान्य राहते. हेच कारण आहे की गेल्या काही वर्षांपासून आपल्या आयुर्वेदात वेलचीचा वापर अनेक आजारांवर होत आहे. एवढेच नाही तर वेलचीच्या सेवनाने रक्तदाब आणि दम्याचा धोकाही कमी होतो.

Is Dandelion Tea Really Beneficial
कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का? वाचा, तज्ज्ञांचे मत…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Tips To Measure Your Blood Pressure
Tips To Measure Your Blood Pressure : रक्तदाब तपासण्याची योग्य पद्धत कोणती, हात कसा ठेवावा? अचूक रीडिंग टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्या ‘या’ टिप्स
Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Neena Gupta says she was not allowed to carry homemade dhaniya powder
Why Spices Are Not Allowed On Flights: घरी बनवलेले मसाले विमान प्रवासात घेऊन जाऊ शकतो का? वाचा, नीना गुप्ता यांचा अनुभव आणि तज्ज्ञांचे मत…
How exercising for 2-3 days may help reduce risk of Alzheimer’s Alzheimer Disease exercise
व्यायामामुळे ‘अल्झायमर’चा धोका कमी होऊ शकतो; डॉक्टरांनी सांगितले व्यायाम प्रकार

आयुर्वेदिक तज्ञ डॉ दीक्षा भावसार यांनी वेलचीचे अनेक फायदे सांगितले आहेत. डॉक्टर दीक्षा यांनी इंस्टाग्रामवर वेलचीमध्ये असलेले औषधी गुणधर्म आणि त्याचा सेवनाने आपल्या शरीरातील रोग बरे करण्याचे गुणधर्म सांगितले आहेत. डॉ दीक्षा सांगतात की ज्या लोकांना जास्त तहान लागते, त्यांना आयुर्वेदात वेलची खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यांनी सांगितले की, जर तुम्हाला पुरेसे पाणी प्यायल्यानंतरही तहान लागण्याची समस्या येत असेल तर वेलची तुम्हाला खूप मदत करू शकते.

वेलचीच्या सेवनाने पोट आणि गॅसची समस्या कमी होते

डॉ दीक्षा भावसार सांगतात की, आयुर्वेदानुसार, वेलचीमध्ये त्रिदोषक गुणधर्म असतात, म्हणजेच ती कफ, वित्त आणि वात दोष सुधारते. हे केवळ पाचन तंत्र मजबूत करत नाही तर पोट फुगणे आणि गॅसची समस्या देखील कमी करते.

तसेच वेलची कफ दोष संतुलित करते, विशेषतः पोट आणि फुफ्फुसांसाठी ते खूप फायदेशीर आहे. वेलची देखील वात दोष शांत करण्याचे काम करते. वेलचीची चव गरम असते. तसेच शरीराला डिटॉक्सिफाय करते.

लघवी संबंधित समस्या कमी होतात

डॉ दीक्षा सांगतात की, वेलचीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे वेलचीच्या सेवनाने तुमच्या शरीरातील रक्तदाब आणि दमा बरा करते. याशिवाय अपचन, लघवीत जळजळ आणि इतर अनेक आजार बरे होतात. तसेच यात जुलाब बरा करण्याची क्षमता आहे. याकरिता तुम्ही चहामध्ये वेलची पूड मिसळून तुम्ही रोज पिऊ शकता.

जर तोंडाचा वास तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही नेहमी वेलचीचे दाणे तोंडात ठेवू शकता. डॉ दीक्षा सांगतात की वेलचीचा चहा दिवसातून दोनदा जेवणाच्या एक तास आधी प्यावा. तसेच २५० ते ५०० मिलीग्राम वेलची बारीक करून त्यात तूप मिसळून सेवन करा. वेलची पावडर तुपात मिसळून याचे नियमित सेवन केल्याने शरीरसाठी फार उपयुक्त ठरेल.