आगामी सणासुदीच्या काळानिमित्त ई-कॉमर्स संकेतस्थळ फ्लिपकार्टचा ‘बिग बिलियन डेज’ हा सेल 29 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे.  4 ऑक्टोबरपर्यंत हा सेल सुरू असेल. या सेलमध्ये ग्राहकांना अधिकाधिक खरेदी करता यावी किंवा ज्यांच्याकडे पैशांची अडचण आहे अशांसाठी फ्लिपकार्टने ‘कार्डलेस क्रेडिट’ ही नवी सेवा आणली आहे.

क्रेडिट कार्ड नसलेल्या किंवा जे क्रेडिट कार्ड वापरत नाहीत अथवा खरेदीसाठी पर्सनल लोन काढायची ज्यांची इच्छा नसते अशांना या सेवेचा लाभ घेता येईल.  ‘कार्डलेस क्रेडिट’नुसार ग्राहक एक लाख रुपयांपर्यंतची खरेदी करु शकतात. विशेष म्हणजे खरेदी केल्यावर तातडीने पैसे द्यावे लागणार नाहीत. यानुसार ग्राहकांना खरेदी केल्यानंतर पुढील महिन्याच्या १५ तारखेपर्यंत पैसे भरता येतील. याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर ‘चेकआऊट’ करताना योग्य पेमेंट पर्याय निवडावा लागेल. कार्डलेस क्रेडिट सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना डाऊनपेमेंट करण्याचीही आवश्यकता नाही असं कंपनीच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आलं आहे. सेलदरम्यान ग्राहकांना पेमेंट करतेवेळी तीन पर्याय मिळतील :
1 : पुढील महिन्यात शून्य व्याजावर रक्कम भरा
2 : तीन महिन्यांचे इएमआय शून्य व्याजदराने भरा
3 : 12 महिन्यांपर्यंत सुलभ ईएमआयद्वारे पैसे भरा

यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क आकारले जाणार नाही. तसेच, केवायसी प्रक्रिया देखील सुलभ करण्यात आली असल्याचं फ्लिपकार्टने म्हटलंय. ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड नाही, किंवा जे क्रेडिट कार्ड वापरत नाहीत अथवा खरेदीसाठी पर्सनल लोन काढायची ज्यांची इच्छा नसते अशांना आकर्षित करण्यासाठी ही सेवा फायदेशीर ठरेल असं कंपनीचं मत आहे.

आणखी वाचा : घडी घालता येणारा सॅमसंगचा ‘गॅलक्सी फोल्ड’, आज भारतात होणार लाँच

कसा घ्यायचा लाभ –
-सर्वप्रथम पॅन कार्ड आणि इतर माहिती टाकून तुम्हाला किती क्रेडिट लिमिट मिळतंय ते पाहा
-त्यानंतर केवायसी प्रक्रिया दोन मिनिटांत ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करा
-कार्डलेस क्रेडिटचा पर्याय निवडून शॉपिंग करा
-My Account पर्यायावर गेल्यास तुम्हाला किती क्रेडिट मर्यादा मिळालीये याबाबत माहिती मिळेल.
-पुढील महिन्याच्या १५ तारखेपर्यंत फ्लिपकार्ट अॅपद्वारे पेमेंट करा.

Story img Loader