गाजरात अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. गाजराचे फायदे हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे या ऋतूत गाजर खाण्याचा सल्ला दिला जातो. ज्यांनी संपूर्ण हिवाळ्यात गाजर खाल्ले नाही, त्यांच्यासाठी एक खास सल्ला आहे की हिवाळा संपायच्या आधी त्यांनी गाजर खा. कारण त्यानंतर तुम्हाला उर्वरित वर्षभर संधी मिळणार नाही. गाजरांमध्ये विशिष्ट प्रकारचे जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे डोळे, यकृत, किडनी आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.गाजर अतिशय पौष्टिक आहे. हे केवळ पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी प्रदान करत नाही तर यामध्ये प्रोव्हिटामिन ए देखील मोठ्या प्रमाणात असते. अनेक आरोग्यविषयक समस्यांवर सोपं आणि स्वस्त उत्तर म्हणजे बीट गाजराचं ज्यूस. महागडी सौंदर्य उत्पादनं जे काम करु शकत नाही ते थंडीत रोज एक ग्लास बीट गाजराचं ज्यूस पिल्यानं सहज होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सगळ्याव्यतीरीक्त गाजराची भाजीही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया रोज एक गाजर खाण्याचे फायदे.

रोज १ गाजर खाण्याचे फायदे

डोळ्यांसाठी फायदेशीर

गाजरांमध्ये व्हिटॅमिन ए आणि अल्फा-कॅरोटीन आणि बीटा-कॅरोटीन ही दोन कॅरोटीनॉइड्स मुबलक प्रमाणात असतात. पण गाजरात फक्त एकच नाही तर अनेक पोषक तत्व असतात जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतात. गाजरात आढळणारे अँटीऑक्सिडंट ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जातात. हे डोळ्यांच्या रेटिना आणि लेन्ससाठी चांगले आहे.

साखरेचे व्यवस्थापन करण्यास उपयुक्त

गाजरात भरपूर फायबर असते जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. कच्च्या किंवा किंचित शिजलेल्या गाजरांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, मधुमेही रुग्ण आरामात गाजर खाऊ शकतात.

वजनावर नियंत्रण राहते

गाजराची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यात ८८ टक्के पाणी असते. त्यात फायबर असते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. याशिवाय, जर तुम्ही दररोज एक गाजर खाल्ले तर तुम्ही सुमारे ८० टक्के कॅलरीज वापरता, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरलेले वाटते. ही भाजी वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

रक्तातील साखरेची पातळी

“जर तुमच्या रक्तातील साखरेची उच्च पातळी किंवा अनियंत्रित मधुमेह असेल तर, कोणत्याही घरगुती उपचारांचा अवलंब करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे…

हेही वाचा >> अन् चरबी कमी होत नाही? नेमके काय म्हणतात आहारतज्ज्ञ जाणून घ्या..

बीपीचा त्रास असल्यास

जर तुमचा बीपी जास्त असेल तर तुम्ही दररोज १ गाजर खावे. गाजरात पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त असते. ज्यामुळे बीपी कंट्रोलमध्ये ठेवण्याचे काम करते. तसेच शरीरातील सोडियमचे प्रमाण संतुलित ठेवते. त्यामुळे बीपी नियंत्रणात राहते. हृदय निरोगी ठेवण्यासाठीही गाजर खूप चांगले आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Carrot health benefits 8 reasons to have one carrot a day srk
Show comments