गाजर अतिशय पौष्टिक आहे. हे केवळ पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी प्रदान करत नाही तर यामध्ये प्रोव्हिटामिन ए देखील मोठ्या प्रमाणात असते. अनेक आरोग्यविषयक समस्यांवर सोपं आणि स्वस्त उत्तर म्हणजे बीट गाजराचं ज्यूस. महागडी सौंदर्य उत्पादनं जे काम करु शकत नाही ते थंडीत रोज एक ग्लास बीट गाजराचं ज्यूस पिल्यानं सहज होतं.
रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते
गाजराचा एक ग्लास ज्यूस प्यायल्यास रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होते.याद्वारे आपल्या शरिराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे जसे की B6, K, फॉस्फरस आणि पोटॅशियम मिळते.
रक्ताची कमतरता दूर
गाजर खावून तुम्ही तुमचं वजन नियंत्रित करु शकतात. गाजर खाण्याचे तसे अनेक फायदे आहेत. गाजर खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात अनावश्यक चरबी जमा होत असेल तर ती कमी होण्यास मदत होते.
त्वचेवर निरोगी राहते
चेहऱ्यावर पिंपल्स आणि एक्ने दूर झाल्यानंतर त्याचे काळे डाग राहतात. तसेच डोळ्यांखालील डार्क सर्कल सुद्धा तुमचा लूक खराब करतात. या सगळ्यापासून सुटका मिळवण्यासाठी गाजरचा ज्यूस मदत करतो. गाजरातील अँटिऑक्सिडंट्स पेशींचा ऱ्हास रोखण्यासाठी, त्वचा निरोगी आणि तरुण ठेवण्यासाठी मदत करतात.
हेही वाचा >> कमी वयात होणारी केसगळती रोखण्यासाठी खास उपाय; मेथीचे दाणे अन् आवळ्याचा घरगुती हेअर कंडिशनर
आजकाल लहान मुलांना सुद्धा चष्मा लागलेला आपल्याला दिसतो. डोळे चांगले राहावेत म्हणून लहानपणापासूनच काळजी घ्यायला हवी.गाजर खाल्ल्याने डोळ्यांचा प्रकाश वाढतो यामुळे दृष्टी वाढवण्यासाठी गाजर खाण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्हाला व्हिटॅमिन ए-ची कमतरता असेल, तर तुमच्या आहारात गाजराचा ज्यूस समाविष्ट करणे खूप फायदेशीर ठरू शकते.
कफचा त्रास कमी होतो
गाजराच्या ज्युसमध्ये बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात आढळते. हे तुम्हाला तणाव आणि चिंतामुक्त ठेवण्यास मदत करते. वाढत्या नैराश्याच्या लक्षणांपासून आराम मिळतो. गाजराचा ज्युस साखर आणि काळी मिरी मिसळून प्यायल्याने कफचा त्रास कमी होतो.