स्किझोफ्रेनिया अन्य मनोविकारांची शक्यता
पाळीव प्राणी घरात असणे ही श्रीमंतीची लक्षणे असली तरीही अलीकडे सर्वसामान्यांकडेसुद्धा कुत्रा, मांजर यासारखे प्राणी पाळले जातात. मात्र, पाळीव प्राण्यांचा हा शौक अंगावरसुद्धा बेतू शकतो, असे अलीकडेच एका संशोधनातून सिद्ध झाले आहे. एका नव्या अभ्यासानुसार ज्यांच्याकडे मांजर आहे, त्या घरातील व्यक्तींना स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर किंवा अचानक संताप येऊन फिट येण्याची अधिक शक्यता आहे.
जॉन हापकीन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये हा संशोधनपर अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. मांजरीच्या विष्ठेत ‘टॉक्सोप्लास्मा गोंडी’ हा परजिवी जंतू आढळला आहे.
बऱ्याच कालावधीपासून तुम्ही मांजरीच्या संपर्कात असाल तर मोठे झाल्यानंतर आयुष्यात मोठय़ा मानसिक आजाराला तुम्हाला सामोरे जावे लागू शकते. प्रौढ गटातील व्यक्तींच्या तपासणीनंतर हा निष्कर्ष काढण्यात आला. मांजरीचे वय जसजसे वाढत होते, तसतसे त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींमध्ये मानसिक आजार बळावत चालल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले.
डॉक्टरांनी गर्भवतींसुद्धा धोक्याचा इशारा दिला आहे. मांजरीला स्वच्छ करण्यासारखे प्रकार त्यांनी टाळावेत. कारण, मांजरीच्या विष्ठेतील हे जंतू पोटात असणाऱ्या बाळांवरही परिणामकारक ठरू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा