अनेकांना उभे असतान चक्कर येते. यामुळे आरोग्यावर प्रभाव पडू शकतो. ऑर्थोस्टेटिक आणि पोस्टोरल हाइपोटेन्शनमुळे ही समस्या होऊ शकते. ही रक्तदाब कमी होण्याची स्थिती आहे. यामुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते. तसेच, तुमच्या शरीरस्थितीमुळे देखील तुम्हाला चक्कर येऊ शकते. अजून कोणत्या कारणांनी चक्कर येऊ शकते, याबाबत जाणून घेऊया.

१) लवकर उभे होणे

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
While impressing the girl he fell on the stage
‘म्हणून मुलीला कधी इम्प्रेस करायला जाऊ नका…’ मुलीला इम्प्रेस करता करता स्वतःच आपटला; VIDEO पाहून पोट धरून हसाल
Loksatta chaturang bhaybhyti Fear Fear Sound Bhutan Sikkim Tourism
‘भय’भूती : भीतिध्वनी
treatment personality disorders
स्वभाव-विभाव : विकारांतून मुक्ती
पिंपरी-चिंचवड: रूममध्ये डोकावून का पाहात आहात? जाब विचारला म्हणून महिलेवर स्क्रू ड्रायव्हरने केला हल्ला
Sanjeev Abhyankar, Sanjeevan Samadhi Sohala, Mahasadhu Shree Moraya Gosavi Maharaj Sanjivan Samadhi Mandir, pimpari,
पं. संजीव अभ्यंकर यांच्या ‘स्वररंजन भक्तिरसात’ रसिकश्रोते तल्लीन

झोपलेल्या अवस्थेच्या तुलनेत उभे असतानाच्या स्थितीमध्ये हृदयाला शरीरात रक्ताभिसरण करण्यासाठी अतिरिक्त कष्ट करावे लागते. होमोस्टॅसिस टिकवून ठेवण्यासाठी शरीराची स्थिती बदलताच रक्तदाब बदलतो. होमोस्टॅसिस शरीरातील एक स्थिती आहे जी शरीरातील कामे योग्यरितीने व्हावीत यासाठी मदत करते.

जेव्हा तुमचे शरीर एका निश्चित स्थितीत काम करते तेव्हा अचानक स्थिती बदलल्याने शरीराला झटका लागू शकते. या स्थितीमध्ये काही क्षणांसाठी मेंदूला रक्त मिळत नाही. जेव्हा तुम्ही उभे होता तेव्हा तुमचे रक्त शरीराच्या खालच्या भागात जमा होते. आणि त्यास शरिरातील इतर भागांमध्ये पोहोचायला वेळ लागते. जो पर्यंत रक्त शरीराच्या इतर भागांना मिळत नाही तोपर्यंत तुमचा रक्तदाब कमी जास्त होतो, परिणामी चक्कर येते.

अशा स्थितीमध्ये तुम्हाला चक्कर येत असल्यास आपल्या शरीराला संतुलित व्हायला थोडा वेळ द्या. भिंतीचा आश्रय घ्या किंवा कुठे बसा. रक्ताचा पुरवठा सामान्य होण्यासाठी तुम्ही डोके आणि हात वर खाली करू शकता.

२) पाण्याची कमतरता

गर्मी असताना आवश्यक प्रमाणात पाणी न पिल्याने शरीर गरम होते. वातावरणातील तापमान वाढल्यास रक्तदाब कमी होते आणि चक्कर येते. हे टाळण्यासाठी पाणी पिले पाहिजे. शरिरात आवश्यक प्रमाणात पाणी राहिल्यास रक्तदाब नियंत्रणात राहाते.

(थायरॉईडला आलेली सूज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय ठरू शकतात फायदेशीर)

३) मद्यपान करणे

मद्यपान तुमच्या रक्तवाहिन्यांचे नुकसान करते आणि त्यांना अरुंद करते. याने रक्तप्रवाहावरही परिणाम होतो. शरिराला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. परिणामी उभे होताना तुम्हाला थोडे चक्कर येते. तुम्ही कॉफी पिऊन ही समस्या दूर करू शकता. मद्यपान कमी केल्यास किंवा ते सोडल्यास चक्कर येण्याचे थांबू शकते.

४) व्यायाम

व्यायाम करताना स्नायू हृदयातील रक्तप्रवाह वाढवतात. जेव्हा तुम्ही थांबता तेव्हा रक्त परत आपल्या स्थानी येण्यासाठी प्रयत्न करते. यामुळे तुमच्या फुफ्फुसांवर दबाव पडतो. परिणामी उभे होताना किंवा व्यायामानंतर तुम्हाला थोडे चक्कर आल्यासारखे वाटू शकते. यापासून बचावासाठी एका ठिकाणी बसा आणि आपल्या हृदयाचे ठोके सामान्य होऊ द्या. व्यायाम करण्यापूर्वी भरपूर पाणी प्या आणि व्यायाम करत असताना थोडे थोडे पाणी पित राहा.

(फॅटी लिव्हरने होऊ शकतो कर्करोग, त्याची ‘ही’ लक्षणे वेळीच ओळखा)

५) औषधी

उभे झाल्यावर चक्कर येण्यामागे काही औषधी देखील असू शकतात. कारण या औषधी तुमचा रक्तदाब बदलतात. उभे होताना चक्कर येण्यामागचे कारण औषधी आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

६) आरोग्य स्थिती

रक्तदाबाशी संबंधित काही आजार जसे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजार, कानाच्या आतील भागातील आजार आणि हार्मोनल बदल होत असताना उभ होताना तुम्हाला चक्कर येऊ शकते. तसेच, थायरॉइड, मधुमेह, डिमेंशिया सारखे रोग असताना देखील उभे होताना चक्कर येण्याची समस्या होऊ शकते, कारण या आजारांमध्ये रक्तदाब कमी होते. या स्थितीमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

Story img Loader