अकाली पांढरे होणारे केस हा चिंतेचा विषय असून यामागे अनेक करणे असतात. केसांना तेल न लावणे हलक्या किंमतीचा साबण व शॅम्पूचा अधिक वापर करणे, सतत औषधे घेणे, डोकेदुखी, सर्दी-पडसे, बद्धकोष्ठता, मानसिक तणाव, अशक्तपणा, केसांत कोंडा होणे, निद्रानाश, आनुवंशिकता इ. कारणांमुळे केस अकाली पांढरे होतात. शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता असल्यानेही केस अकाली पांढरे होतात. काही लोक आढळले आहे की ज्यांचे केस हिवाळ्यामध्ये पांढरे होतात व उन्हाळ्यामध्ये पुन्हा काळे होतात. मात्र, यामागचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येपासून वाचण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. त्याकरीता नियमित दिनचर्या, उचित वेळी केस धुणे, संतुलित आहार, व्यायाम, उत्तम झोप यांची आवश्यकता असते. केस काळे राखण्यासाठी शरीराला प्रोटिन व्हिटॅमिन ए. बी. सी. डी. ई. कॅल्शिअम आयोडीन, फॉस्फोरस, खनिज क्षार, कार्बोहायड्रेट, आयर्न, कॉपर इ. पदार्थ पर्याप्त प्रमाणात मिळाले पाहिजेत. व्हिटॅमिन व कॉम्लेक्समध्ये आढळणारे पॅन्टोर्थेनिक ऍसिड फॉलिक ऍसिड इ. पदार्थ केस काळे राखण्यात महत्वाची भुमिका बजावतात.त्यामुळे, शरीराला सर्व द्रव्य योग्य प्रमाणात मिळण्याकरिता आहारात दूध, दही, लोणी, पनीर, अंडे, गाजर, मुळा, टोमॅटो, मटार, पालक, लिंबू, आवळा, खजूर, द्राक्षे, सफरचंद, मोसंबी, पालेभाज्या, ताजी फळे, अंकुरीत धान्ये आदिंचा समावेश करावा.
अकाली केस पांढरे होण्यासंदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी :
एक-दोन केस पांढरे झाले असल्यास ते केस तोडू नका. असे केल्याने केस पांढरे होऊ लागता.
थोडे केस पांढरे झाले असल्यास डाय करू नका. त्यामुळे काळ्या केसावरही प्रभाव पडतो. केस आणखी वेगाने पांढरे होऊ लागतात.
केस धुण्यासाठी साबण व शॅम्पू ऐवजी आवळा, रिठे, शिकेकाई, बेसन, दही इ. चा वापर करा. खूप गोड पदार्थ, तेलकट, मसालेदार भोजन, दारु, अमली पदार्थ यांचे सेवन करु नका.
केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
केसांमध्ये हेयर स्प्रे व केस वाळविण्यासाठी हेयर ड्रायरचा वापर कमीत कमी प्रमाणात करावा.
केसांकरिता मेहंदीच्या वापराचे अनेक फायदे आहेत. मुख्यत्वेकरून मेहंदी जरी केस रंगवण्यासाठी वापरली जात असली तरी अशीच नियमित लावण्याने केसांचे आरोग्य सुधारते. केसांवर एक छान चकाकी येऊन केस सुटे सुटे होऊन खुलतात. ज्याला कंडिशनर असे म्हणले जाते. केस अकाली पांढरे होत नाहीत. डोक्याला कोंडा होण्याचा थांबतो व केसांची वाढ होते. तुरळक पांढरे झालेल्या केसांना मेंदी लावून झाकता येते. रासयनिक डायमधील द्रव्यांचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून १५ दिवसांतून एकदा मेहंदी लावावी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा