Yoga For Sound Sleep: निद्रानाश हा असा आजार आहे ज्याचा त्रास अनेकांना होत असतो. हा आजार आपल्या आयुष्याचा एक भाग कधी बनतो हे आपल्याला कळत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावर कोणताही इलाज नाही. औषधे घेतल्याने ते कमी करता येते पण नाहीसे होत नाही. हा झोपेचा विकार आहे ज्याचा लोकांना सतत त्रास होत आहे. इंग्रजीत त्याला स्लीप डिसऑर्डर (sleep disorder) म्हणतात. अशी परिस्थिती ज्यामध्ये लोकांची झोप कमी होते आणि कधी कधी लोक रात्रभर जागे राहतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, निद्रानाश दूर करण्यासाठी औषधापेक्षा ध्यान अधिक प्रभावी आहे. चला तर मग जाणून घेऊया चांगल्या झोपेसाठी कोणती आसने आवश्यक आहेत.

चक्रवकासन | Chakravakasana | Cat- Cow Pose

चक्रवकासन | Chakravakasana | Cat- Cow Pose - freepik
चक्रवकासन | Chakravakasana | Cat- Cow Pose

सर्व प्रथम, चटईवर गुडघे टेकून बसा.
आता पुढे वाकून हात जमिनीवर ठेवा.
अशा प्रकारे तुम्ही दोन गुडघे आमि दोन हातांवर प्राण्यांसारखे उभे राहा.
दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवा.
मान आणि पाठीचा कणा सरळ ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या.
आता श्वास सोडताना पाठीचा कणावरच्या दिशेला ओढण्याचा प्रयत्न करा.
नंतर श्वास घेताना खालच्या दिशने वाकवा. असे ३ ते ५ वेळा करा.
यामुळे तुमच्या पाठीच्या आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळेल. याशिवाय मणक्यातही लवचिकता येईल.

कॉफी प्यायल्याने मृत्यूचा धोका कमी होतो? अभ्यासातून नेमकं काय समोर आलं? (फोटो सौजन्य @freepik)
Coffee Benefits : कॉफी प्यायल्याने मृत्यूचा धोका कमी होतो? अभ्यासातून नेमकं काय समोर आलं?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
elephant and her baby viral video
अरेरे! पिल्लाला झोपेतून उठवणारी आई; कधी सोंड, तर कधी शेपटी ओढत प्रयत्न सुरू; Viral Video पाहून आवरणार नाही हसू
Here’s what happens to the body if you have ghee water on an empty stomach daily
Ghee: झोपेतून उठताच एक चमचा तुपाचे सेवन करण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क; खाण्याची पद्धतही नीट वाचा
Bad Breath Smell Home Remedies
तोंडातून येणारी दुर्गंधी काही सेकंदांत होईल दूर! फक्त करून पाहा ‘हा’ सोपा उपाय; मिळेल ताजेतवानेपणाचा अनुभव
What happens to the body when you sleep at 8 PM and wake up at 4 AM? health tips
जर तुम्ही रात्री ८ वाजता झोपला आणि पहाटे ४ वाजता उठला, तर शरीरावर काय परिणाम होईल? वाचा डॉक्टर काय सांगतात
Benefits of wearing socks at night
Sleeping With Socks : रात्री मोजे घालून झोपल्याने मिळतात अनेक फायदे; पण ‘या’ चुकांमुळे होतील अनेक आरोग्य समस्या
which is the best pillow for sleep snoring and pillow
तज्ज्ञांनी सांगितलेली ही उशी तुमचे घोरणे कमी करू शकते? जाणून घ्या…

उत्तानासन | Uttanasana | Forward Fold

उत्तानासन | Uttanasana | Forward Fold
उत्तानासन | Uttanasana | Forward Fold -फोटो सौजन्य – फ्रिपीक)

सर्वप्रथम, चटईवर सरळ उभे रहा.
पाय सरळ ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या आणि हात खाली करून कंबरेतून वाका.
या काळात तुमचे गुडघे वाकू नयेत हे लक्षात ठेवा.
आता हाताने बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा
आणि आपल्या गुडघ्याला नाकाने स्पर्श करा.
हे आसन केल्याने मन शांत होते आणि निद्रानाशाच्या समस्येपासून आराम मिळतो.

बालासन | Balasana | Child’s Pose

Balasana | Child's Pose - फ्रिपीक
Balasana | Child’s Pose


चटईवर गुडघे टेकून बसा.
आता तुमच्या गुडघ्यावर बसा.
दीर्घ श्वास घ्या आणि पुढे झुका.
दोन्ही मांड्यांमध्ये पोट घ्या आणि श्वास सोडा.
आणि आपल्या नाकाने चटईला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. हे आसन ४ वेळा करा.

(टिप – लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader