आचार्य चाणक्य, महान अर्थशास्त्रज्ञ आणि चतुरस्त्र रणनीतिकार, त्यांच्या धोरणांसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. चाणक्य यांच्या मते, जर तुम्हाला आनंदी जीवन जगायचे असेल, तर जीवनात काही तत्त्वे आणि शिस्त असणे अत्यंत आवश्यक आहे. आचार्य चाणक्य, ज्यांना कौटिल्य म्हणून ओळखले जाते, त्यांनी चंद्र गुप्त मौर्यच्या मगधचा सम्राट होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात चाणक्यजींची धोरणे घेतली तर त्याचे आयुष्य आनंदाने आणि शांततेने व्यतीत होते.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात चार गोष्टींना सर्वोच्च स्थान दिले आहे. चाणक्य यांच्या मते या गोष्टी जगात सर्वात शक्तिशाली आहेत. म्हणून चाणक्यजी हे मानतात की व्यक्तीने आपल्या जीवनात या गोष्टींचा नेहमी आदर केला पाहिजे.

आईचा दर्जा सर्वोच्च आहे

आचार्य चाणक्य यांच्या मते, गुरु आणि देवी-देवतांपेक्षाही आईला संपूर्ण जगात सर्वोच्च स्थान आहे, म्हणूनच आईचा नेहमी आदर केला पाहिजे. जी व्यक्ती आपल्या आईला आदर देते, त्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात.

अन्नदान

आचार्य चाणक्यजी असे मानतात की अन्नदान करणे हे सर्वात मोठे पुण्य आहे. अन्न आणि पिण्याचे पाणी दान केल्याने तुम्हाला गरजूंचा आशीर्वाद जाणवतो. त्यामुळे माणसाने नेहमी दान आणि परोपकार करत राहावे.

गायत्री मंत्र

आचार्य चाणक्यजी असे मानतात की जगातील सर्वात शक्तिशाली मंत्र गायत्री मंत्र आहे. या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला त्याच्या आयुष्यात शक्ती, दीर्घायुष्य आणि अपार संपत्ती प्राप्त होते.

एकादशी तिथी

चाणक्यजींनी एकादशी तिथीचे वर्णन सर्वात पवित्र मानले आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व पाप आणि दुःख दूर होतात. तसेच एकादशी तिथीची पूजा केल्याने अधिक फळ मिळते. एका वर्षात सुमारे २४ एकादशी असतात. या सर्वांमध्ये कार्तिक महिन्यातील देवूठाणी एकादशी ही सर्वात महत्त्वाची मानली जाते.

Story img Loader