Chanakya Niti on Love Relationships : महान अर्थशास्त्री आचार्य चाणक्य यांनी एका नीती शास्त्राची रचना केली होती. यामध्ये त्यांनी धन, संपत्ती, स्त्री, मित्र, करिअर आणि दांपत्य जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचा सखोल उल्लेख केला आहे. चाणक्य यांनी आपल्या नीतींमधून नेहमी समाजाला मार्गदर्शन केले आहे. असे मानले जाते की जो व्यक्ती आचार्य चाणक्य यांच्या नीतीचे अनुसरण करतो, तो आपल्या जीवनात यशस्वी ठरतो.
आचार्य चाणक्य सांगतात की प्रेम संबंधांमध्ये बांधले गेलेल्या दोन व्यक्तींचा एकमेकांवर अतूट विश्वास असायला हवा. त्यांच्यानुसार, ज्या नात्यात विश्वास असतो ते नाते प्रत्येक संकटाचा सामना करण्यात यशस्वी ठरते. सोबतच, चाणक्य सांगतात की नात्यांमध्ये स्वातंत्र्य असणे महत्त्वाचे आहे. ज्या नात्यात स्वातंत्र्य नसते, त्या नात्यातील व्यक्तींना काही काळानंतर कंटाळा येऊ लागतो आणि त्यांच्यामध्ये बंदिवासात गेल्याची भावना निर्माण झाल्यानंतर त्यांना ते नाते संपवावेसे वाटते.
चाणक्य यांच्यानुसार, ज्या संबंधांमध्ये स्वातंत्र्य असते ते बंदिस्त नातेसंबंधांपेक्षा अधिक मजबूत आणि परिपक्व असतात. चाणक्य म्हणतात की एखाद्या व्यक्तीशी आपले नाते अधिक घट्ट व्हावे असे कोणाला वाटत असेल तर त्या व्यक्तीला स्वातंत्र्य द्या. चाणक्य यांनी नात्यामधील कटुता टाळण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यांच्या मते, लोकांनी तीन गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांचे नाते बिघडू शकते. जाणून घेऊया या तीन गोष्टी.
Astrology : कुंडलीत ‘हे’ पाच योग असतील तर वैवाहिक आयुष्य राहील सुखमय!
आदराचा अभाव :
प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की आपल्या जोडीदाराने आपला आदर करावा. अशा वेळी चाणक्य सांगतात की तुमच्या जोडीदाराचा स्वाभिमान कधीही दुखवू नका. जेव्हा लोकांचा आदर कमी होतो, तेव्हा ते नातेही कमकुवत होऊ लागते. कारण माणसाला एकवेळ पैसे मिळाला नाही तरी चालेल पण तो आपल्या स्वाभिमानाशी तडजोड करत नाही.
अहंकार नातेसंबंध नष्ट करू शकतो:
चाणक्य म्हणतात की प्रेमसंबंधांमध्ये अहंकाराला जागा नसावी. जेव्हा तुम्ही स्वतःला जास्त आणि तुमच्या जोडीदाराला कमी लेखता तेव्हा ते नाते बिघडू शकते. त्यामुळे अहंकार करू नये. कारण प्रेमाचे फळ अहंकाराच्या झाडावर कधीच उगवत नाही. म्हणूनच प्रेमाच्या नात्यात अहंकार येऊ नये.
दिखावा करणे टाळा :
प्रेमात दिखावा नसावा. चाणक्य प्रेमाला साधेपणाचे रूप मानतात. त्यांच्या मते, जे दिखावा करतात त्यांना स्वार्थी म्हणतात, तर प्रेमात समर्पण आवश्यक असते. तसेच, एक ना एक दिवस दिखावा पकडला जातो. कारण त्यात असत्य दडलेले असते.
(येथे दिलेली माहिती सामान्य माहिती आणि गृहीतकांवर आधारित आहे.)