चाणक्य नीतिमध्ये जीवन यशस्वी करण्यासाठी अनेक प्रकारचे उपदेश दिले आहेत. उपदेश चांगल्या प्रकारे समजून घेत आपल्या जीवनात त्याचा अवलंब केल्यास त्याच्याआयुष्यातील अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. चाणक्य नीतिमध्ये सांगितले आहे की, आपण पैशाचा व्यवहार कसा करावा, पैशाची बचत कशी करावी आणि त्या पैशाचा योग्य वापर करण्याचा मार्ग काय आहे? दुसरीकडे, यशाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात शत्रू अनेकदा अडथळे निर्माण करतात. प्रत्येक यशस्वी व्यक्तीला ज्ञात आणि अज्ञात शत्रू असतात. हे शत्रू वेळोवेळी नुकसान करण्याचा प्रयत्न करत असतात. जेव्हा एखादी व्यक्ती सावध आणि सक्षम असते आणि चुकांपासून दूर असते, तेव्हा तो शत्रूला घाबरत नाही. शत्रू इच्छेनेही अशा लोकांचे नुकसान करू शकत नाही. चाणक्याने शत्रूशी सामना करण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्या जाणून घेऊयात.
शत्रूला कधीही कमी लेखू नका: एखाद्या व्यक्तीच्या यशानंतर त्याचे पाय खेचण्यासाठी शत्रू सक्रिय होतात. त्यामुळे शत्रूला कमकुवत समजण्याची चूक कधीही करू नका. कधी कधी ही चूक आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरते. शत्रूला कमकुवत समजू नका, त्याच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवा.
अहंकारापासून दूर राहा: लोकं अनेकदा यशाचा अभिमान बाळगतात आणि शत्रू किंवा प्रतिस्पर्ध्याला खूप कमकुवत समजतात. अशा चुकीमुळे नंतर खूप मोठे नुकसान होऊ शकते. कारण ज्याने तुमच्याशी स्पर्धा केली आहे त्याच्याकडे तुमच्यासारखीच क्षमता असते. त्यामुळे अशा शत्रूंचा सामना करण्यासाठी स्वतःला तयार ठेवा आणि पुढे जा. पण प्रतिसाद केव्हा द्यायचा, योग्य वेळेची वाट पहा.
Chanakya NITI: संकट समोर असेल तर आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
रागावर नियंत्रण ठेवा: शत्रूचा पराभव करायचा असेल तर सर्व प्रकारच्या वाईट सवयी टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राग ही देखील एक वाईट सवय आहे. याचा फायदा शत्रूंना होतो. रागाच्या भरात माणूस नेहमी चूक करतो. ही चूक कधीकधी शत्रूला लाभाची संधी देते. कठीण परिस्थितीशी लढण्यासाठी व्यक्तीने नेहमी मानसिकदृष्ट्या सक्षम असलं पाहिजे.