Chanakya Niti In Marathi : आजच्या युगात प्रत्येक लहान-मोठ्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज आहे. पैसा मिळवण्यासाठी माणूस रात्रंदिवस मेहनत करतो. पण अनेक वेळा लाख प्रयत्न करूनही त्यात यश मिळत नाही, तेव्हा माणूस निराश होतो. पैसा आला तरी कुठेतरी खर्च होतो. म्हणजेच पैसा हातात उभा राहू शकत नाही. चाणक्य नीतिमध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यामुळे घरात लक्ष्मी वास करत नाही.
चाणक्य नीतिनुसार ज्या घरात लोक आपापसात भांडत राहतात, म्हणजेच ज्या घरात कलहाचं वातावरण असतं, त्या घरात लक्ष्मी कधी टिकत नाही. त्याचप्रमाणे ज्या घरांमध्ये शांतता नसते, तेथे पैसा टिकत नाही आणि नेहमीच आर्थिक संकट असतं. ज्या घरात सुख-शांतीचं वातावरण असतं त्याच घरात देवी लक्ष्मीचा वास असतो.
आणखी वाचा : शनीच्या या राशीत २०२२ मध्ये तयार होणार त्रिग्रही योग, या ४ राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक मोठे बदल होतील
ज्या घरात पती-पत्नीचं परस्पर भांडण असतं, तिथे आर्थिक समस्याही असतात. म्हणजेच ज्या घरात पती-पत्नीमध्ये प्रेम नसतं, तिथे देवी लक्ष्मी वास करत नाही. चाणक्य नीतिनुसार जिथे महिलांचा आदर केला जात नाही तिथेही देवी लक्ष्मी राहत नाही. जिथे पती-पत्नीमध्ये चांगले संबंध असतात आणि त्यांच्यात प्रेमाची भावना असते, तिथे देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते.
आणखी वाचा : Ear Pain in Winters : हिवाळ्यात कानदुखीकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं, ही एक गंभीर समस्या असू शकते
चाणक्य नीतिनुसार जो व्यक्ती दान आणि परोपकाराचे कार्य करत राहतो, त्याच्या घरात सुख-समृद्धीची कमतरता नसते. जे लोक आपल्या कमाईचा काही भाग धर्मादाय कार्यात लावतात, त्यांना स्वतःला कधीही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही. कोणाच्याही मदतीसाठी पैसे न वापरणाऱ्यांच्या घरात नेहमीच अशांततेचं वातावरण असतं.