आचार्य चाणक्यजी यांना राजकीय, आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांची सखोल जाण होती. म्हणूनच आचार्य चाणक्य यांचीही इतिहासातील सर्वात बुद्धिमान व्यक्तींमध्ये गणना होते. सर्व बाबी लक्षात घेऊन ते कोणताही निर्णय घेत असत, असे सांगितले जाते. चाणक्य नीतीमध्ये आचार्यांचे विचार संकलित केले आहेत.

आचार्य चाणक्यांनी सांगितलेली ही धोरणे सध्याच्या काळातही अतिशय समर्पक मानली जातात. या धोरणात्मक पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी जीवनाचे सत्य सांगण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक पैलूबद्दल सांगणाऱ्या चाणक्याने प्रेमप्रकरणांबद्दलही आपले मत मांडले आहे. काय आहे ते जाणून घेऊयात-

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
judiciary curb politics Courts Marathi speaking Chief Justice
मनमानी राजकारणावर न्यायव्यवस्था अंकुश ठेवू शकेल?
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”

आचार्य चाणक्य यांच्या मते, बंधनांशी संबंधित नातेसंबंधांपेक्षा अधिक मजबूत आणि परिपक्व नातेसंबंध ज्यामध्ये स्वातंत्र्य असते. आचार्य चाणक्यजी म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीशी आपले नाते घट्ट व्हावे असे वाटत असेल तर त्याला स्वातंत्र्य देणे सुरू करा.

आदरांचा अभाव

प्रत्येक व्यक्तीला त्याच्या साथीदारांनी त्याचा आदर करावा असे वाटते, अशा स्थितीत चाणक्यजी म्हणतात की, लोकांनी कधीही आपल्या साथीदारांचा स्वाभिमान दुखावू नये. कारण जेव्हा लोकांचा आदर आणि सन्मान कमी होतो तेव्हा ते नातेही कमकुवत होते.

गर्व करू नका

चाणक्यजी यांच्या नुसार प्रेमप्रकरणात अहंकाराला थारा नसावा. अहंकारामुळे एखादी व्यक्ती आपले अस्तित्व विसरते आणि जेव्हा तुम्ही स्वतःला जास्त महत्त्व देता आणि जोडीदाराला कमी महत्त्व देता तेव्हा ते नाते बिघडते. त्यामुळे उद्धटपणा टाळा.

देखावा करू नये

प्रेमात दिखावा नसावा, प्रेम हे कोणत्याही प्रकारच्या दिखावाच्या पलीकडे असते. म्हणूनच चाणक्य प्रेमालाच साधेपणाचे रूप मानतो. त्यांच्या मते, जे दाखवतात त्यांना स्वार्थी म्हणतात, तर प्रेमात शरण जाणे आवश्यक असते.

आचार्य चाणक्यजी यांच्या नुसार प्रेमाच्या नात्यात बांधलेल्या दोन व्यक्तींचा एकमेकांवर अतूट विश्वास असायला हवा. तसेच ज्या नात्यामध्ये विश्वास असतो ते प्रत्येक आव्हान जिंकण्यात यशस्वी होतात. तसेच, चाणक्य सांगतात की, नातेसंबंधांमध्ये स्वातंत्र्य असणे खूप महत्वाचे आहे.