आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या धोरणांना आजही तितकंच महत्त्व आहे. आचार्य चाणक्य एक महान विद्धान, राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ होते. आजही असं म्हटलं जातं की, जे लोक आचार्य चाणक्य यांच्या धोरणांची अमलबजावणी करतात. त्यांना अडचणींशी सामना करण्याचं बळ मिळतं. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीति या पुस्तकात व्यावहारिक जीवनाशी संबंधित सर्व गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने मांडल्या आहेत. चाणक्य नीतित पैशांबद्दल काय सांगितलं आहे, जाणून घेऊयात.
चाणक्य नीतिनुसार ज्या घरात लोकं एकमेकांशी भांडण करतात. घरात कायम कलह असतो, अशा ठिकाणी लक्ष्मी टिकत नाही. ज्या घरात शांतता नसते, तिथे आर्थिक चणचण भासते. या उलट शांतता असलेल्या घरात लक्ष्मी देवी वास करतो.
पैशांवरचे प्रेम : प्रत्येकाला पैशाचे आकर्षण असले तरी चाणक्य म्हणतात की, पैशाचा मोह कधीही करू नये. म्हणजेच पैसा कमावण्याचे वेड नसावे. कारण पैसा मिळाल्यावर जे अहंकारी होतात, त्यांची संपत्ती फार काळ टिकत नाही. जेव्हा संपत्ती येते तेव्हा फळांनी भरलेल्या झाडासारखे होणे शहाणपणाचे आहे.
पैशाचे संरक्षण : चाणक्य नीतीनुसार धनाचा वापर दान, गुंतवणूक आणि संरक्षणासाठी केला पाहिजे. पैसा नदीसारखा वापरला पाहिजे. बरेच लोक पैसे साठवतात, ठेवतात, वापरत नाहीत. चाणक्य नीतीनुसार वाईट काळात पैसा खऱ्या मित्राची भूमिका बजावतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी.
समाजाची भीती : पैशाची देवाणघेवाण करताना स्थानिक म्हणजेच समाजाची भीती बाळगू नये. या व्यवहारात जो व्यक्ती व्यवहार करू शकत नाही, तो श्रीमंत होऊ शकत नाही. याशिवाय चाणक्य नीती सांगते की जे लोक अनावश्यकपणे पैसे खर्च करतात, लक्ष्मी नाराज होते आणि असं ठिकाण किंवा व्यक्ती सोडून जाते.
योग्य मार्गाने कमावलेला पैसा : चाणक्य नीतिनुसार गैर मार्गाने कमावलेल्या पैशाचे आयुष्य फक्त दहा वर्षांचे असते. अकराव्या वर्षानंतर अशा पैशांचा नाश होऊ लागतो आणि तो तुमचा मूळ पैसा, जे काही तुमच्या मालकीचे आहे ते काढून घेतो. पैसा नेहमी योग्य मार्गाने मिळवला पाहिजे. कारण चुकीच्या पद्धतीने कमावलेला पैसा काही काळासाठीच आधार देतो.