Chanakya Niti In Marathi : महिलांचा आदर करण्याची बाब जवळपास प्रत्येक धर्मात आणि संविधानात सांगितलेली आहे. त्यांच्यामध्ये भरपूर क्षमता आणि योग्यता आहे. ही गोष्ट शेकडो वर्षांपूर्वी समजली होती, त्यामुळे प्रतापी राजांपासून ते ज्ञानी पुरूषांपर्यंत सर्वांनी स्त्रियांच्या सन्मानाला प्राधान्य दिलं आहे. थोर समाजशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांनीही त्यांच्या धोरणात स्त्रियांबद्दल तपशीलवार विवेचन केलं आहे. यासोबतच त्यांनी महिलांचा आदर, सन्मान आणि चारित्र्य गुणांबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.
महिलांशी संबंधित या गोष्टी विसरू नका
आचार्य चाणक्य सांगतात की ज्या घरात शिक्षित, कर्तबगार आणि हुशार स्त्रिया असतात, असं घराणं खूप नाव कमावतं. त्यांच्यामध्ये सदैव सुख आणि समृद्धी असते. त्यामुळे महिलांचे शिक्षण आणि त्यांच्या विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. कुटुंब आणि समाज घडवण्यात आणि नष्ट करण्यात त्यांचा मोठा हात आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आणि समाजाची प्रगती पहायची असेल तर महिलांबाबत या ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. नाहीतर सगळा समाजच स्त्रियांसाठी दोषी ठरेल.
आणखी वाचा : Health Tips : वयाच्या चाळीशीनंतर या ५ सवयी घातक ठरू शकतात, हृदय आणि मनावर परिणाम होऊ शकतो
चाणक्य नीति म्हणते की स्त्रियांना नेहमी आदर द्या. जो समाज महिलांचा आदर करत नाही तो कधीच प्रगतीशील होऊ शकत नाही. कारण महिलांच्या योगदानाशिवाय समाजाची प्रगती थांबेल. त्यामुळे प्रत्येक निर्णयात त्यांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे.
अशिक्षित समाज कधीच प्रगती करू शकत नाही. या समाजातील निम्मी लोकसंख्या महिला असल्याने त्यांच्या शिक्षणाशिवाय हा उद्देश पूर्ण होऊ शकत नाही.
आणखी वाचा : ज्यांच्या पायावर अशी चिन्ह असतात, ते खूप श्रीमंत होतात, काय म्हणतं समुद्रशास्त्र ?
स्त्री शिक्षित झाली. पण तिच्या क्षमतेचा योग्य वापर केला नाही तर ती निरुपयोगी होईल. त्यामुळे प्रत्येक समाजाने महिलांच्या ज्ञानाचा त्यांच्या प्रतिभेचा योग्य उपयोग होईल याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी घरात आणि समाजात त्यांच्या बोलण्याला आणि कामाला महत्त्व द्यावे लागेल. त्यांना त्यांच्यातील कलागुण दाखवण्याची संधी दिली पाहिजे.