Chanakya Niti In Marathi : महान रणनीतिकार आचार्य चाणक्य यांनी समाजाच्या कल्याणासाठी धोरण तयार केले होते. या धोरणात संपत्ती, शिक्षण, वैवाहिक जीवन, कौटुंबिक संबंध, मित्र-शत्रू यासह प्रत्येक विषयावर सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आचार्य चाणक्याची धोरणे सध्याच्या काळातही प्रासंगिक मानली जातात. असं म्हणतात की जो व्यक्ती आपल्या जीवनात त्याची धोरणे स्वीकारतो, त्याचे ध्येय साध्य होण्याची शक्यता वाढते.
या नीतिमध्ये आचार्य चाणक्य यांनी माणसाच्या काही अशा सवयी सांगितल्या आहेत, ज्यामुळे माणूस गरीब होतो आणि लक्ष्मीही त्याला सोडून जाते. त्यामुळे तुम्हालाही तुमच्या आयुष्यात श्रीमंत व्हायचं असेल तर चाणक्यजींच्या या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणे : आचार्य चाणक्य यांच्यानुसार जो व्यक्ती आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतो किंवा जो अनावश्यकपणे पैसे खर्च करतो, तो व्यक्ती नेहमी त्रासलेला असतो. आचार्य चाणक्य यांच्या मते, जीवनात पैसा जमा करणे आणि बचत करणे खूप महत्त्वाचं आहे. कारण ते तुम्हाला कठीण काळात साथ देतं. जर एखादी व्यक्ती अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करते, तर लक्ष्मी देखील त्याच्यावर कोपते.
चुकीची संगत : आचार्य चाणक्यजी सांगतात की, ज्या लोकांची चुकीची संगत असते ते धनाची देवी लक्ष्मीच्या आशीर्वादापासून वंचित राहतात. कारण चुकीच्या संगतीचा परिणाम माणसावर खूप होतो. अशा लोकांना त्यांच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागतो.
फसवणूक करणारा : जी व्यक्ती इतरांची फसवणूक करते किंवा पाठीमागून वार करतात, अशा लोकांना समाजातून कधीच सन्मान मिळत नाही. अशा लोकांना पैसे मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. कारण आई लक्ष्मी त्यांना साथ देत नाही.
लबाड: चाणक्यजींच्या मते, जो व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी खोटे बोलतो, त्याच्यावर आई लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. कारण अशा लोकांना समाजात अनेकदा लाजही पत्करावी लागते.