महान रणनीतिकार आचार्य चाणक्य त्यांच्या बुद्धीमत्तेसाठी प्रसिद्ध आहेत. चंद्रगुप्त मौर्य यांना राजा बनवण्यात आचार्य चाणक्य यांचे मोठे योगदान होते. असे म्हणतात की, चाणक्याच्या धोरणांमुळेच चंद्रगुप्त मौर्य सम्राट बनण्यात यशस्वी होऊ शकले. आचार्य चाणक्याची धोरणे सध्याच्या काळातही प्रासंगिक मानली जातात. चाणक्य यांनी समाजाच्या कल्याणासाठी धोरण तयार केले होते. या धोरणात संपत्ती, शिक्षण, वैवाहिक जीवन, कौटुंबिक संबंध, मित्र-शत्रू यासह प्रत्येक विषयावर सूचना देण्यात आल्या आहेत. या नीतिमध्ये आचार्य चाणक्य यांनी माणसाच्या काही अशा सवयी सांगितल्या आहेत. तसेच चाणक्य नीतीमध्ये स्त्रीबद्दल तपशीलवार सांगितले आहे.

चाणक्य नीति सांगते की, धार्मिक विचार असलेल्या स्त्रीशी विवाह केल्याने व्यक्ती भाग्यवान बनते. अशी स्त्री घराला स्वर्गसारखं ठेवते. घरात नित्य पूजा व पठण होते. त्या घरात देवाचा वास असतो. अशा घरात कधीच अडचण येत नाही. आयुष्यात काहीही झाले तरी अशी स्त्री आपल्या पतीची साथ कधीच सोडत नाही. परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची त्यांच्यात चांगली क्षमता आहे. अशा स्त्रिया धैर्याने कठीण प्रसंगाचा सामना करतात. त्यामुळे कुटुंबाच्या अडचणी कमी होण्यास मदत होते.

Astrology 2021: २९ डिसेंबरला बुध ग्रहाचं राशी परिवर्तन; ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ

राग हा माणसाचा सर्वात वाईट शत्रू आहे. चाणक्य नीतिनुसार जी स्त्री रागवत नाही, ती घराला स्वर्ग बनवते. अशा स्त्रीला योग्य-अयोग्याची योग्य समज असते. अशा महिलेच्या वास्तव्यामुळे कुटुंबात नेहमी आनंदाचे वातावरण असते. गोड बोलणाऱ्या स्त्रीला सर्वत्र मान मिळतो. अशा स्त्रीशी लग्न करणाऱ्या व्यक्तीचे नशीब बदलते. अशा स्त्रीच्या उपस्थितीमुळे कुटुंबात नेहमी आनंद आणि शांतीचे वातावरण असते.

Story img Loader